Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर भूकंपाने हादरलं !

कोल्हापूर प्रतिनिधी - पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. आज सकाळी ६.४५ च्या सुमारास हे धक्के

विधानसभा निवडणुकीचा उडणार धुरळा !
आजचे राशीचक्र बुधवार, १३ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
भरधाव टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक ; अपघात सीसीटीव्हीत कै

कोल्हापूर प्रतिनिधी – पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. आज सकाळी ६.४५ च्या सुमारास हे धक्के बसले. भूकंपमापकावर तब्बल ३.४ रिश्टर स्केलची नोंद झाली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीखाली ५ किमी खाली होता. आज सकाळी ६.४५ च्या सुमारास मोठा धरणीकंप झाला. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. भीतीपोटी अनेक नागरिक घराबाहेर पडले. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात हे धक्के जाणवले. कोल्हापूर पासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य देखील हे भूकंपाचे धक्के जाणवले. तर सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह आसपासच्या गावात भूकंपाचे धक्के बसले. दरम्यान, सकाळी कामानिमित्त तसेच फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. यासोबतच कोयना धरण परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात देखील भूकंपाचे धक्के बसले आहे. येथील चांदोली अभयारण्य परिसरापासून १५ किमी परिसरात हे धक्के बसले. या भूकंपामुळे सुदैवाने कुठेही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी ते काही काळ बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट होते. अनेक नागरिक सुरक्षेचा उपाय म्हणून घराबाहेर पडले

COMMENTS