देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः आजी आजोबा हे मुलांच्या आयुष्यातील संस्काराचे ज्ञानपीठ आहे.त्यांच्याकडून मिळालेली संस्काराची शिदोरी जीवनात मार्गदर्शक ठ
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः आजी आजोबा हे मुलांच्या आयुष्यातील संस्काराचे ज्ञानपीठ आहे.त्यांच्याकडून मिळालेली संस्काराची शिदोरी जीवनात मार्गदर्शक ठरते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पत्रकार हल्ला कृती समितीचे उत्तर जिल्हा समन्वयक राजेंद्र उंडे यांनी केले. देवळाली प्रवरा ता. राहुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत आजी आजोबा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन उंडे बोलत होते. यावेळी आजी आजोबा यांचे पूजन करुन दंडवत घातला. विद्यार्थ्यांनी आजी आजोबांबद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शोभा मोरे, माजी अध्यक्ष सुनिल शेटे, सदस्य नानासाहेब होले, अमोल भांगरे, प्रमोद गाडे, बाळासाहेब कडू, आण्णासाहेब चव्हाण, ठकाबापू देवगिरे, सुरेश अंबिलवादे, किसन टिक्कल, भिमराज शेटे, प्रियंका पेरणे, पुजा घोरपडे, मुख्याध्यापिका मंगल पठारे, उर्दुचे मुख्याध्यापक इमाम सय्यद आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका मंगल पठारे यांनी आजी आजोबा यांचे महत्व सांगितले.आजी आजोबांसाठी संगीत खुर्ची या मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित आजी आजोबांनी आपल्या नातवावर असणारे प्रेम आपल्या भाषणातून व्यक्त केले. यावेळी धोडींराम भांगरे, ताराबाई देवगिरे, नंदाबाई चव्हाण, कडूबाई चव्हाण, गयाबाई गाढे, अलका मुसमाडे, शुभांगी शेटे, उषा शेटे, वैशाली काळे, स्वाती कदम, हौसाबाई उंडे, नुतन जंगले, कुसुम बोरकर, लंका टिक्कल, शाहुराव शेलार, सुशीला तेलोरे, धुप्रदा हारगुडे, राफायल पंडीत, मुमताज शेख, रहेमान शेख, सिताबाई टिक्कल, किरण पंडीत, अमोल पंडीत, ज्ञानदेव भालेकर, नामदेव टिक्कल, मीरा भालेकर, गितांजली भांगरे, रोहिणी कुमावत, संगीता खंडागळे, लैला तांबोळी, कुसुम सरोदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भास्कर बुलाखे तर आभार प्रदर्शन हसन शेख यांनी केले.
COMMENTS