Homeताज्या बातम्याशहरं

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला ; हल्लेखोरांची ओळख पटली

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे 2 वाजेच्या सुमाराला धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. अभिनेत्याच्या वांद्र परिसरातील घरात हा ह

श्रीगोंद्यात सात जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
Majalgaon : पंचायत समिती सभापतींची पतीचं झाले सभापती…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या गेटला कुलप कोणाचे ?

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे 2 वाजेच्या सुमाराला धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. अभिनेत्याच्या वांद्र परिसरातील घरात हा हल्ला झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.हल्ला करणार्‍या आरोपीची ओळख पटली आहे. या आरोपीने चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरी प्रवेश केला असून त्याच्यावर या आधीही घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी हा सराईत घरफोड्या असल्याची माहिती समोर येत आहे. चोरी करण्यापूर्वी त्याने सैफ अली खानच्या घराची रेकी केल्याचीही माहिती आली. त्याला पोलिसांनी या आधीही अटक केल्याचेही समोर आले आहे. सैफ अली खानवर करण्यात आलेला हल्ला हा केवळ चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भातील प्राथमिक माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या मोलकरणीशी वाद घातला. त्यावेळी सैफने मध्यस्थी करून त्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला गंभीर अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेता सैफ आपल्या कुटुंबासोबत वाद्रे येथील अपार्टमेंटमध्ये 12 व्या मजल्यावर राहतो. लिलावतीमध्ये सैफ अलीवर उपचार सुरू आहेत.

COMMENTS