Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केकेआरच्या दिल्लीवरील विजयाने आव्हान कायम    

सुनिल नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने  दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी पराभव केला. नाणेफेक गम

श्री क्षेत्र कानिफनाथ गड मढी ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड मायंबा रोपवेचे काम मंजूर  : आ. मोनिका राजळे
उपमुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता

सुनिल नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने  दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागल्यानंतर गतविजेत्या केकेआरने २० षटकांत ९ बाद २०४ धावा केल्या, त्यामध्ये अंगकृश रघुवंशीच्या शानदार ४४ धावांच्या खेळीचा समावेश होता. प्रत्युत्तरात दिल्लीला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ १९० धावा करता आल्या आणि सलग दुसरा सामना गमावला. केकेआरकडून नारायणने तीन आणि वरुणने दोन तर अनुकुल रॉय, वैभव अरोरा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.

               दिल्लीने या मोसमात आतापर्यंत घरच्या अरूण जेटली स्टेडियमवर एकूण चार सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी तीन सामने गमावले तर एक सुपर ओव्हरमध्ये जिंकला. तर घरापासून दूर, अक्षर पटेलच्या संघाने सहा पैकी पाच सामने जिंकले, तर एक पराभव पत्करावा लागला. मंगळवारी या विजयासह कोलकाताने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्यांच्या खात्यात नऊ गुण आहेत तर निव्वळ धावगती ०.२७१ आहे. त्याच वेळी, दिल्ली १२ गुण आणि ०.३६२ च्या निव्वळ धावगतीसह चौथ्या स्थानावर आहे.

                विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची धक्कादायक सुरुवात झाली. अनुकुल रॉयने पहिल्याच षटकात अभिषेक पोरेलला रसेल करवी झेलबाद केले. त्याला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या करुण नायरने १५ धावा आणि केएल राहुलने ७ धावा केल्या.  चौथ्या विकेटसाठी फॅफ डू प्लेसिसला कर्णधार अक्षर पटेलने चांगली साथ दिली. दोघांमध्ये ४२ चेंडूत ७६ धावांची भागीदारी झाली. नारायणने अक्षरला आपला बळी बनवले. चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने तो ४३ धावा करून बाद झाला. दरम्यान, फाफ डू प्लेसिसने या मोसमातील दुसरे अर्धशतक ३१ चेंडूत पूर्ण केले. त्याने ४५ चेंडूत ६२ धावा केल्या. दिल्लीकडून विपराज निगमने ३८ धावा केल्या. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्याच्या शिवाय ट्रिस्टन स्टब्सने एक धाव, आशुतोष शर्माने सात धावा आणि मिचेल स्टार्क शुन्यावर बाद झाला.  दुष्मंथा चमीरा आणि कुलदीप यादव अनुक्रमे दोन आणि एक धाव काढून नाबाद राहिले.

                या सामन्यात रहमानउल्ला गुरबाज आणि सुनिल नारायण यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी झाली. स्टार्कने गुरबाजला आपला शिकार बनवले. १२ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा करून तो बाद झाला. यानंतर विप्रराज निगमने सुनिल नारायणला २७ धावांवर पायचित केले. 

                 तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य राहाणेने काही चांगले फटके खेळले आणि २६ धावा करून बाद झाला. रिंकू सिंगच्या साथीने आंगकृष्ण रघुवंशीने दिल्लीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि पन्नासहून अधिक धावांची भागीदारी केली. चमीराने रघुवंशीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तो ३२ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला तर रिंकूने तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावांची चांगली खेळी केली. त्याचवेळी व्यंकटेश अय्यरची बॅट आज शांत राहिली. त्याला केवळ सात धावा करता आल्या, तर रसेल त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी १७ धावा करून धावबाद झाला. रोव्हमन पॉवेलने पाच धावा केल्या तर अनुकुल रॉय खातेही उघडू शकला नाही. हर्षित राणा खाते न उघडताच नाबाद राहिला तर त्याच्या सोबत वरुण चक्रवर्तीने एका धावेवर नाबाद परतला. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने तीन तर विपराज निगम आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी दुष्मंथा चमीराने एक बळी मिळविला.

                गतविजेत्या केकेआरच्या कामगिरीत नसलेले सातत्य, फलंदाजांचे अपयश यामुळे ते गुणतालिकेत पहिल्या चार क्रमांकात नाही. मात्र या विजयामुळे प्ले ऑफ मध्ये पोहण्याच्या त्यांच्या आशा जिवंत आहेत. पुढील सर्व सामने जिंकून सरस धावाती राखली तर प्ले ऑफ मध्ये तो पोहोचू तर शकतात, पण आपले गतविजेतेपद राखण्याची क्षमता अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वात केकेआर निश्चित बाळगून आहे.

@ डॉ.दत्ता विघावे                        

क्रिकेट समिक्षक 

COMMENTS