अकोले : शेती क्षेत्राला अमेरिकेसाठी खुले करून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेला देशोधडीला लावणाऱ्या व भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटात ढकलणाऱ्या भारत अमेरिका व्यापार करारा विरोधात देशभर आंदोलन सुरू झाले असून महाराष्ट्रात हे आंदोलन तीव्र करण्याची घोषणा मुंबईत अखिल भारतीय किसान सभेतर्फे करण्यात आली. लाँग मार्च व राज्यभरातील इतर शेतकरी आंदोलनात नेतृत्व करणाऱ्या शेतकरी कार्यकर्त्यांना ‘शेतकरी योद्धा’ पुरस्कार देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राजस्थानचे लढाऊ शेतकरी नेते खा. आमरा राम, त्रिपुराचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र चौधरी यांच्या हस्ते शेतकरी योद्ध्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय नेत्या मरियम ढवळे, आ. विनोद निकोले, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले, प्राची हातिवलेकर, डॉ. एस. के. रेगे, शैलेंद्र कांबळे, किरण गहला, अजय बुरांडे, अमोल वाघमारे आदी नेते यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात 2017 व 2019 मध्ये अभूतपूर्व विजयी कर्जमाफी आंदोलन झाले. आता विदर्भातील आंदोलनात पुन्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात आली. किसान सभेने या सर्व आंदोलनात नेतृत्वदायी सहभाग घेतला होता. राजस्थानमध्येही कर्जमाफी आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व करून किसान सभेने कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिले. राजस्थानच्या या व इतर अनेक लढ्याचे अनुभव सांगत केंद्रातील मोदी सरकारच्या श्रमिक विरोधी धोरणांची पोलखोल यावेळी खासदार आमरा राम यांनी केली. महाराष्ट्रातील दोन्ही लाँग मार्च, ऊस आंदोलन, कर्जमाफी आंदोलन, शक्तिपीठ व इनाम जमीन आंदोलन तसेच हिरडा, धान व इतर शेतमालाच्या रास्त भावासाठी सुरू असलेल्या आंदोलनांना चालना देण्यासाठी करावयाच्या कामाबाबत डॉ. अशोक ढवळे यांनी मार्गदर्शन केले. देशबुडव्या भारत अमेरिका व्यापार करारातील गंभीर धोके समजावून देत त्याविरुद्ध जोरदार लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. आ. विनोद निकोले, मरियम ढवळे, अमोल वाघमारे, अजय बुरांडे, जितेंद्र चोपडे, सुनील मालुसरे, गुलाब मुलाणी यांची यावेळी भाषणे झाली. डॉ. अजित नवले यांनी प्रास्ताविक केले. उमेश देशमुख यांनी सूत्र संचालन केले.

अकोले : शेती क्षेत्राला अमेरिकेसाठी खुले करून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेला देशोधडीला लावणाऱ्या व भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटात ढकलणाऱ्या भारत अमेरिका व्यापार करारा विरोधात देशभर आंदोलन सुरू झाले असून महाराष्ट्रात हे आंदोलन तीव्र करण्याची घोषणा मुंबईत अखिल भारतीय किसान सभेतर्फे करण्यात आली.
लाँग मार्च व राज्यभरातील इतर शेतकरी आंदोलनात नेतृत्व करणाऱ्या शेतकरी कार्यकर्त्यांना ‘शेतकरी योद्धा’ पुरस्कार देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राजस्थानचे लढाऊ शेतकरी नेते खा. आमरा राम, त्रिपुराचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र चौधरी यांच्या हस्ते शेतकरी योद्ध्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय नेत्या मरियम ढवळे, आ. विनोद निकोले, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले, प्राची हातिवलेकर, डॉ. एस. के. रेगे, शैलेंद्र कांबळे, किरण गहला, अजय बुरांडे, अमोल वाघमारे आदी नेते यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रात 2017 व 2019 मध्ये अभूतपूर्व विजयी कर्जमाफी आंदोलन झाले. आता विदर्भातील आंदोलनात पुन्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात आली. किसान सभेने या सर्व आंदोलनात नेतृत्वदायी सहभाग घेतला होता. राजस्थानमध्येही कर्जमाफी आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व करून किसान सभेने कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिले. राजस्थानच्या या व इतर अनेक लढ्याचे अनुभव सांगत केंद्रातील मोदी सरकारच्या श्रमिक विरोधी धोरणांची पोलखोल यावेळी खासदार आमरा राम यांनी केली.
महाराष्ट्रातील दोन्ही लाँग मार्च, ऊस आंदोलन, कर्जमाफी आंदोलन, शक्तिपीठ व इनाम जमीन आंदोलन तसेच हिरडा, धान व इतर शेतमालाच्या रास्त भावासाठी सुरू असलेल्या आंदोलनांना चालना देण्यासाठी करावयाच्या कामाबाबत डॉ. अशोक ढवळे यांनी मार्गदर्शन केले. देशबुडव्या भारत अमेरिका व्यापार करारातील गंभीर धोके समजावून देत त्याविरुद्ध जोरदार लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. आ. विनोद निकोले, मरियम ढवळे, अमोल वाघमारे, अजय बुरांडे, जितेंद्र चोपडे, सुनील मालुसरे, गुलाब मुलाणी यांची यावेळी भाषणे झाली. डॉ. अजित नवले यांनी प्रास्ताविक केले. उमेश देशमुख यांनी सूत्र संचालन केले.

COMMENTS