सातारा प्रतिनिधी- उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या पालीचा खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या विवाह सोहळा आज मोठ्या थाटात आणि येळकोट येळकोट जय मल्ह

सातारा प्रतिनिधी- उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या पालीचा खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या विवाह सोहळा आज मोठ्या थाटात आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात संपन्न झाला असून या यात्रेसाठी महाराष्ट्र सह कर्नाटक आंध्र या भागातील लाखो भाविका सहभागी झाले होते. सकाळी काकड आरती झाल्यानंतर पाल देवस्थानचे मुख्य मानकरी असलेले देवराज पाटील यांच्या उपस्थितीत खंडोबा आणि म्हाळसा देवीची विधिवत पूजा करून त्यांची भंडारा खोबऱ्याची उधळण करत पाल पंचक्रोशीतुन मिरवणुक काढण्यात आली. कोरोना आजरा नंतर तब्बल दोन वर्षांनी संपन्न झालेल्या पालच्या खंडोबा म्हाळसादेवीच्या यात्रेत भाविकांचा उदंड उत्साह पहिला मिळाला. या यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांकडून यात्रा परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लाखो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली खंडोबा म्हाळसा देवीची पालखी मिरवणूक सायंकाळच्या सुमारास तारळी नदीच्या काठावर गेल्यानंतर गोरस मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसा देवीचा शाही विविह सोहळा मिठ्या उत्सात संपन्न झाला. पाली गावात सर्वत्रच भांडाऱ्याची उधळण झाल्याचे पहिला मिळत असून लाखोंचा संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये देखील यंदा मोठा उत्साह दिसून येत आहे.
COMMENTS