नेवासा : नेवासा बुद्रुक येथील खंडोबा म्हाळसादेवी सच्चिदानंद बाबा, नारदमुनी मंदिरात आयोजित चंपाषष्ठी उत्सवाची सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प
नेवासा : नेवासा बुद्रुक येथील खंडोबा म्हाळसादेवी सच्चिदानंद बाबा, नारदमुनी मंदिरात आयोजित चंपाषष्ठी उत्सवाची सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता करण्यात आली.यावेळी खंडोबा म्हाळसादेवी मंदिराचा सहावा वर्धापनदिन ही साजरा करण्यात आला.
भगवंताच्या नामाद्वारे जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करा असे आवाहन महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांनी यावेळी झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी बोलतांना केले. यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात बोलतांना हभप उद्धवजी महाराज मंडलिक म्हणाले की खंडोबा हे दैवत संपूर्ण देशाचे श्रध्दास्थान असून आपले नेवासा बुद्रुक हे गाव त्यांची सासुरवाडी आहे हे आपले भाग्य आहे, सामन्यांमध्ये राहून पद प्रतिष्ठेने मोठे व्हा,चांगल्यांचा आदर्श जीवनात घ्या, भजन किर्तन हे समाजाला चांगले विचार देण्याचे साधन असून दुर्बुद्धीची घाण व अज्ञानाची काजळी यामुळे दूर होते,ज्ञानाचा प्रकाश ही याने मिळतो, घरे ही पैशावर चालत नाही ते चांगल्या पध्दतीने चालण्यासाठी पुण्य ही आवश्यक असते,पुण्याची प्राप्ती अन्नदान,तीर्थयात्रा व देवाचे नामस्मरण करून मिळते, आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करून अज्ञानाला संपवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या सांगता प्रसंगी खंडोबा म्हाळसादेवी देवस्थानचे देवस्थानचे अध्यक्ष डॉ.मुरलीधर कराळे, तुकारामजी नवले,भेंडे येथील मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब धस,कोंडीराम महाराज पेचे,मंदिर सेवेकरी प्रभाकरदादा बोरकर,एकनाथ रेडे, बाळासाहेब जपे, गणपत नळकांडे,रमेश काशीद,एकनाथ डोहळे,रावसाहेब पेचे,गोकुळ जायगुडे,सर्जेराव चव्हाण, ज्ञानेश्वर महाराज पेचे,अशोक काळे, प्रवचनकार रंजनाताई भाकरे,महिला भजनी मंडळाच्या प्रमुख सौ.कमलताई कराळे,अशोक मारकळी,केशव महाराज डौले,कोंडीराम महाराज पेचे,ज्ञानेश्वर माऊली शिंदे,हभप भिसे महाराज,पुंजाराम महाराज पेचे, गाडगेबाबा भजनी मंडळातील सेवेकरी यांच्यासह हजारो भाविक यावेळी उपस्थित होते.
अखंड हरिनाम सप्ताहात योगदान देणाऱ्या अन्नदात्यांचा महंत उध्दवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.रात्री उशिरापर्यंत भाकरी व भरीत प्रसादाचे वाटप देवस्थानच्या वतीने करण्यात आले. चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांनी येथे येऊन दर्शन घेतले.

COMMENTS