खडसेंच्या चौकशीचा ससेमिरा काही संपेना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खडसेंच्या चौकशीचा ससेमिरा काही संपेना

भोसरी भुखंड प्रकरणाची एसीबी पुन्हा करणार चौकशी

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या चौकशीचा ससेमिरा काही संपण्याची शक्यता नाही. खडस

पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू होता जुगाराचा अड्डा…
विरारमध्ये रुग्णालयात आग, १३ रुग्णांचा मृत्यू
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी उद्धव ठाकरेंना दिलासा

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या चौकशीचा ससेमिरा काही संपण्याची शक्यता नाही. खडसे यांना शिंदे सरकारने मोठा झटका दिला आहे. भोसरी एमआयडी भुखंड घोट्याळाचा तपास पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत होणार आहे. एकनाथ शिंदे सरकारने एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. भोसरी एमआयडी भुखंड घोट्याळाचा तपास पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत होणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना खडसे यांना भुंखड घोटाळ्याप्रकरणी क्लिनचिट मिळाली होती. पण आता लाचलुचपत विभागाने घोट्याळाची पुन्हा चौकशीच्या करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे खडसेंना मोठा धक्का मानला जात आहे.मध्यंतरी या प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी केली होती.एवढंच नाहीतर खडसेंचे जावाई गिरीश चौधरी यांना अटकही करण्यात आली होती. या प्रकरणाची आता पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत चौकशी होणार आहे. भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केली. तीन कोटी 75 लाख रुपयांना जमिनीची खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद आहे. स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

COMMENTS