Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटींची मदत देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा नाट्यगृह युद्धपातळीवर पुन्हा उभारण्याची ग्वाही

कोल्हापूर ः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर भक्कमपणे उभारलेले संगीतसूर्य केशवराव भोसले ऐतिहासिक नाट्यगृह भक्कमपणे उभारले होते. या

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ
ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार
मुंबईकरांना एप्रिलपासून मिळणार मोफत वैद्यकीय उपचार

कोल्हापूर ः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर भक्कमपणे उभारलेले संगीतसूर्य केशवराव भोसले ऐतिहासिक नाट्यगृह भक्कमपणे उभारले होते. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापुरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची अर्थिक मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली. आगीने नुकसान झालेल्या भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 8 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झाले ही अतिशय दुर्देवी घटना आहे. हे नाट्यगृह युद्धपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार 25 कोटी रूपयांची गरज आहे. नाट्यगृहाचा विमा 5 कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक कलाकार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कलाकारांशी संवाद साधून त्यांना धीरही दिला. माध्यमांशी संवाद साधून त्यांच्यामार्फत त्यांनी कोल्हापूर मधील नागरिकांना आवाहनही केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नाट्यगृहे अनेक असतात पण काही नाट्यगृहांशी कलावंत आणि श्रोत्यांचे जिव्हाळ्याचे नाते असते. जशा कोल्हापूर वासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत. अनेक कलावंताची मागणी आहे की, हे नाट्यगृह जसं पूर्वी होतं तसंच पुन्हा उभं राहावं. मदतीसाठी मला खूप फोन आले, खूप मेसेजेस आले. शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारे असून कलावंत आणि श्रोत्यांचादेखील आदर करणारं आहे. ते पुढे म्हणाले, स्थानिक कलावंतांशी संवाद साधल्यानंतर नाट्यगृहाशी भावनिक नातं किती घट्ट होतं याची एक प्रचिती येते. नुकसानग्रस्त झालेल्या नाट्यगृहासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, याबाबत फॉरेन्सिंक विभाग व पोलीस विभाग या घटनेची चौकशीही करीत आहेत. परंतु हे नाट्यगृह उभे पुन्हा राहणे हे महत्त्वाचे आहे. चौकशी होईल आणि जे दोषी असतील त्याच्यावर पुढे कारवाईही होईल.

COMMENTS