Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बळीराजाला सुखी, समाधानी ठेव… पांडुरंगचरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे!

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळ

अपघातात सात भाविकांचा मृत्यू
कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीला तडे
बुद्धांचा जन्म या पृथ्वीतलावर होणे सर्वात दुर्लभ; पु.भिक्खु डॉ.सुमनवन्नो महाथेरो

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्या याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने 130 कोटीचा निधी मंजूर केलेला होता. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून प्रशासनाने हे काम अत्यंत जलद गतीने पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सुविधा सुलभ व कमी वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

कार्तिकी यात्रा 2025च्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर, सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते पार पडली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, अभिजीत पाटील, तानाजी सावंत, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व समिती सदस्य तसेच समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS