Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्तिक स्वामी मंदिर शुक्रवारी दर्शनासाठी खुले : गोरखनाथ गुरव

इस्लामपूर / प्रतिनिधी : श्री क्षेत्र मल्लिकार्जुन डोंगरावरती असणारे कार्तिक स्वामी मंदिर शुक्रवारी दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांना दर्श

Yeola : येवला तालुक्यातील धुळगाव येथील भूमिपुत्राला अखेरचा सलाम (Video)
पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वेच्या विस्तारीकरणाबाबत बैठक
मॉड्युलर बेडचे नागरिकांनी व्यवस्थित वापर करावा : राहुल महाडीक

इस्लामपूर / प्रतिनिधी : श्री क्षेत्र मल्लिकार्जुन डोंगरावरती असणारे कार्तिक स्वामी मंदिर शुक्रवारी दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांना दर्शन घेता येईल अशी माहिती मल्लिकार्जुन सेवा भावी मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव यांनी दिली.
कार्तिक स्वामी दर्शनाचा योग असल्याकारणाने शुक्रवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी त्रिपुरा पौर्णिमा रात्री 9:55 नंतर कार्तिक स्वामी दर्शनाचा योग आहे. तो 16 नोव्हेंबर पहाटे 2:58 मिंनिटापर्यंत कार्तिक स्वामी दर्शनाचा योग आहे, असे आवाहनही गोरखनाथ गुरव यांनी केले आहे.
त्यानिमित्त शुक्रवारी सकाळी मंदिरातील साफसफाई स्वच्छता, डेकोरेशन, फुलांची सजावट, सेवाभावी मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. सर्व श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थानच्या शिवभक्त बंधू भगिनींनी या दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोरखनाथ गुरव यांनी केले आहे.

COMMENTS