Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मवीरांचा आदर्श माऊली वृद्धाश्रमातील कार्यात ः केरू बारहाते

वडाळा महादेव/प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाजसेवी कार्याचा अनेकांनी आदर्श घेतला आहे, माऊली

विश्‍वनाथ कातोरे यांचे निधन
तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता चिंताजनक : ज‍िल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगडडा
नगरला सेक्स रॅकेटचे ग्रहण?… त्या महिलेचा पर्दाफाश करा

वडाळा महादेव/प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाजसेवी कार्याचा अनेकांनी आदर्श घेतला आहे, माऊली वृद्धाश्रमातील सुभाष वाघुंडे व कल्पनाताई वाघुंडे यांनीही कर्मवीर अण्णा यांचा सेवा आदर्श घेतला असल्याचे मत कोळगाव येथील माजी सैनिक करूजी बारहाते यांनी व्यक्त केले.
   शिरसगाव येथील माऊली वृद्धाश्रमात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 64वा पुण्यतिथी सोहळा विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी करू बारहाते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे होते.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर प्रतिमापूजन केले. यावेळी कवी, पत्रकार राजेंद्र देसाई यांनी कर्मवीर अण्णांचे मोठेपण सांगून आम्ही त्यांच्यामुळे शिक्षणक्षेत्रात आलो असे सांगून सुभाष वाघुंडे यांच्यासमोर हाच आदर्श असल्याचे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ’रयतेमधुनी’, ’कर्मवीर झाले नसते तर’, ’कर्मवीर व लक्ष्मीबाई पाटील ’अशा कविता सादर केल्या.तसेच कर्मवीर अण्णांचे जीवनचरित्र सांगितले. कर्मवीर ह निरपेक्ष शिक्षणतपस्वी होते, त्यांनी स्वतः साठी, घरादारासाठी काही न करता रयतेची सेवा केली, म्हणूनच ते मावनसेवेचे तीर्थक्षेत्र असल्याचे सांगितले. केरू बारहाते यांनी संस्कृती आणि प्रामाणिक जीवनाचे संदर्भ सांगितले,सुभाष वाघुंडे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून स्वावलंबी शिक्षण कसे घेतले ते सांगितले. श्रीरामपूर येथील किशोर टॉकीजजवळ चिक्की, शेंगदाणे, फुटाणे विकून आम्ही वडिलांनी सांगितल्याप्रमाणे कर्मवीर अण्णा यांचा आदर्श जपला, शिक्षण घेतले. तोच संस्कार घेऊन आज कार्य करीत असल्याचे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी वृद्धाश्रमासाठी अनेक पुस्तके भेट दिली व सूत्रसंचालन केले. सोहळ्यास वृद्धाश्रमातील आजी, आजोबा उपस्थित होते. शुभम नामेकर यांनी आभार मानले.

COMMENTS