Karmaala : वैद्यकीय सेवेसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नवीन अँबुलन्स खरेदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Karmaala : वैद्यकीय सेवेसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नवीन अँबुलन्स खरेदी

 करमाळा तालुक्यातील केम जिल्ह्यामध्ये आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी यथाशर्थीचे प्रयत्न करून केम गावामध्ये वैद्यकीय तात्काळ सेवेसाठी ग्रामपंचायतीच्या म

माजलगाव नगरपालिका 10 दिवसांपासून बंद
घंटागाडी येत नसल्याने बाबुर्डी रोड परिसरात घाणीचे साम्राज्य
1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणी संकट ? 

 करमाळा तालुक्यातील केम जिल्ह्यामध्ये आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी यथाशर्थीचे प्रयत्न करून केम गावामध्ये वैद्यकीय तात्काळ सेवेसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नवीन अँबुलन्स खरेदी करण्यात आली आहे केम येथील विवाहित पुजा जाधव या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला . जर या महिलेला वेळीच करमाळा येथे नेले असते तर ती वाचली असती . यामुळे केम ग्रामपंचायत ने ठरवले की गावापासून सर्व मोठे वैद्यकीय दवाखाने 70 ते 110 किलोमीटर च्या अंतरावर आहेत .      त्यामुळे केम व पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेची तात्काळ सोय व्हावी म्हणून केम ग्रामपंचायत ने स्वताच्या मालकीची अॅम्बुलन्स खरेदी केली आहे     दसऱ्यानिमित्त महंत जयंतगिरी महाराज व जेष्ठ नेते दिलीप दादा तळेकर ,  यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा गांधी चौक केम येथे पार पडला . यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे  डॉक्टर तळेकर ,  पालखे , उपसरपंच नागन्नाथ तळेकर गुरूजी ,यांच्यासह  मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते .

COMMENTS