Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

15 हजारांचा गंडा घालणार्‍या भोंदूविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा

कर्जत प्रतिनिधी - ’नवरा काहीच कामधंदा करत नाही त्याला बाहेरचा नाद आहे’ हे ठीक करण्यासाठी एका भोंदूबाबाने 15 हजार रुपये उकळल्याची घटना कर्जत तालुक

सामाजिक ऋण निस्वार्थ भावनेने फेडणारा अवलिया
राज्यातील सहकारी पतसंस्थांना दिलासा
दिवाळीच्या आनंदपर्वाला उत्साहात झाली सुरुवात ; वसुबारस पूजा उत्साहात

कर्जत प्रतिनिधी – ’नवरा काहीच कामधंदा करत नाही त्याला बाहेरचा नाद आहे’ हे ठीक करण्यासाठी एका भोंदूबाबाने 15 हजार रुपये उकळल्याची घटना कर्जत तालुक्यात जळकेवाडी येथील भोंदूबाबाने केली आहे. या भोंदूबाबा विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी, भोंदूबाबाने फिर्यादी व तिच्या मुलीसमोर पाट ठेऊन त्यावर गहू ठेऊन अगरबत्ती लावून स्वतः जवळची पांढरी पावडर ओवाळून ती पावडर पंधरा दिवस भाजीत टाकून नवर्‍याला खायला देण्याचा व ताईत गळ्यात बांधण्याचा सल्ला देऊन पंधरा हजार उकळले. मात्र पंधरा दिवसानंतरही नवरा आणि त्याची सवय ’जैसे थे’ राहिल्याने अखेर फिर्यादींनी भोंदूबाबा विरुद्ध गुन्हा दाखल केला. नवनाथ साहेबराव मांडगे असे या भोंदूबाबावर ’महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील एक महिलेची मुलगी पतीसह पुणे येथे राहते. महिलेचा पती काही कामधंदा करत नसल्याने व त्रास देत असल्याचे फिर्यादीने शेजारी राहत असलेल्या महिलेला सांगितले. तेव्हा तिने ओळखीच्या जळकेवाडी येथील नवनाथ मांडगे या मांत्रिकाला तिच्या घरी बोलावले. त्यानंतर फिर्यादी व तिच्या मुलीला समोर बसवुन त्यांच्या समोर पाट मांडून त्यावर गहू ठेऊन, अगरबत्ती लावून त्यावर ठेवलेला गव्हाचा एक- एक दाणा बाजूला काढून व गव्हाचे दाणे मोजून ’बाई तुझे सर्व खरे आहे तुझा नवरा काहीही कामधंदा करत नाही, त्याला बाहेरचे नाद आहेत’असे म्हणून त्याने पांढरी पावडरची पुडी अगरबत्ती पाटासमोर ओवाळून ’ही पुडी पंधरा दिवस नवर्‍याला भाजीतून चार, तुझा नवरा व्यवस्थित होऊन तू म्हणशील तसे तुझे ऐकेल’असे सांगितले.  त्यानंतर पुडीसह तीन ताईत मुलगी व घरातील महिलांच्या गळ्यात बांधण्यास सांगितले. त्यांच्याकडून 15 हजार उकळले. नंतर मला 1 हजार रुपये दे असे म्हणाला. त्यानंतर काही दिवसांनी लोणी मसदपूर येथे भेट होताच तो राहिलेले हजार रुपये फिर्यादीला मागत होता. त्यानंतर पंधरा दिवसांनी फिर्यादीच्या मुलीस पावडर खायला घातली का?असे विचारले असता ’सगळी पावडर खायला घातली व ताईतही बांधले पण काहीही फरक पडला नाही’ असे तिने सांगितले. आता आपली फसवणूक झाली आहे अशी खात्री होताच आणि पुन्हा पैसे मागत असल्याने फिर्यादीने गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पांडुरंग भांडवलकर, राजेश थोरात हे करत आहेत. कोणताही आजार आणि मनस्थिती जादूटोणा, धुपारे अंगारे अशा उपचाराने बरा होत नाही. नागरिकांनी कोणत्याही भोंदूबाबाच्या,मांत्रिकाच्या जादूटोण्याला बळी पडू नये. पोलिसांशी संपर्क साधावा, तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी म्हटले आहे.

COMMENTS