कर्जत/ प्रतिनिधी ः दारुच्या नशेत पोलिसांना खोटी माहिती देणार्याला कर्जत पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील दिपक
कर्जत/ प्रतिनिधी ः दारुच्या नशेत पोलिसांना खोटी माहिती देणार्याला कर्जत पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील दिपक भीमराव माने, याच्याविरुद्ध कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, पोलीस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे हे 22 ऑगस्ट रोजी राशीन पोलिस दूरक्षेत्र येथे तात्काळ मदत पुरवणार्या डायल 112 करीता नेमण्यात आलेले होते. त्यावेळी त्यांना सकाळी 11. 49 वाजता डायल 112 वर 9850307668 या नंबरवरुन कॉल आला. कॉल करणार्या व्यक्तीस त्याच्या मुलाने मारहाण केली आहे. यात मला लागले आहे. मला तात्काळ पोलिस मदत हवी आहे. पोलिस मदत मिळाली नाही तर आत्महत्या करतो, असे म्हणत कॉल आला होता. कॉल आल्याने पोलिस कॉन्स्टेबल मुरकुटे यांनी तात्काळ त्याच्या 9850307668 या नंबरवर कॉल केला. त्यास घटनास्थळ कोठे आहे, असे विचारले. त्यावेळी त्याने जलालपुर ता. कर्जत येथे असल्याचे सांगितले.
पो. कॉ. मुरकुटे यांनी तेथे जाऊन खात्री केली. त्यावेळी कॉल करणारा दिपक भिमराव माने हा दारु पिलेला आढळून आला. त्यास कोणीही मारहाण केलेली नव्हती. तो दारुच्या नशेत डायल 112 ला कॉल करीत असल्याचे स्पष्ट झाले. मुरकुटे यांनी त्यास तुला काय फिर्याद द्यायची असेल तर राशीन पोलिस दूरक्षेत्र येथे येऊन दे,असे सांगितले. त्यास कोणीही मारहाण केली नसतानाही त्याने पुन्हा डायल 112 ला त्याच्या मोबाईलवरून दुपारी 12. 9 वाजता व 4. 22 वाजता तसाच कॉल केला. कोणतीही मारहाण झाली नसताना पोलिस प्रशासनाची दिशाभुल करून शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सोयीचा दुरुपयोग केला. पोलिस स्टेशनला खोटी माहिती दिल्याने पोलिस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांनी त्याच्याविरुद्ध कलम 177 अन्वये फिर्याद दाखल केली. कर्जत उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राशीन पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल मारुती काळे, पोलीस नाईक संभाजी वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांनी ही कारवाई केली.
COMMENTS