Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी सैनिकांचा सन्मान करून कारगिल विजय उत्साहात

राहाता ः राहाता तालुक्यातील खडकेवाके गावामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटने कडून 26 जुलै सन 1999 यावर्षी भारत पाकिस्तान युद्ध जवळपास दोन महिने चालू हो

आईसाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचे रक्तदान युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम वेगात ; 85 खांब राहिले उभे, नियोजित वेळेआधीच काम पूर्ण होण्याची शक्यता
लसीकरणाबाबत रोहित पवारांनी मोदी सरकारला दिला महत्वाचा सल्ला l पहा LokNews24*

राहाता ः राहाता तालुक्यातील खडकेवाके गावामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटने कडून 26 जुलै सन 1999 यावर्षी भारत पाकिस्तान युद्ध जवळपास दोन महिने चालू होते. या युद्धामध्ये भारताला विजय मिळाला तसेच भारतीय सेनेतील काहीना विरमरण आले अशा सैनिकांना यावेळी अभिवादन करण्यात आले.
यावेळी खडके वाके गावातील मेजर सुनील लावरे यांचा भीमशक्ती संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सैनिक असलेले लावरे मेजर यांनी सांगितले की मी सैन्य दलामध्ये बावीस वर्ष भारत मातेची सेवा केली. माझ्या या बावीस वर्षाच्या कार्यकाळात मला कारगिल युद्धामध्ये युद्ध करण्याची संधी भेटली. युद्धामध्ये आलेले अनुभव,हृदय हेलावून टाकणार्‍या काही घटनांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये मी काम केले. तसेच तरुणांनी सैन्य दलात जाऊन आपल्या देशाचे व भारत मातेचे रक्षण करावे असा ही संदेश त्यांनी तरूण युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले. याप्रसंगी भीमशक्ती जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संदीप लावरे, माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ मूजमुले, योगेश लावरे, सचिन लावरे, रंगनाथ मुरादे, रंगनाथ लावरे, डॉ. नचिकेत लावरे, भागवत लावरे, शिवाजी गायकवाड, कैलास मुरादे,सोपान चिकने, बापूसाहेब मुरादे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS