Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करंजीतील काळे विद्यालय व जिल्हा परिषद शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

कोपरगाव शहर ः रयत शिक्षण संस्थेचे कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयातील पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती पर

समता चॅलेंजरने पटकावला करंडक व प्रथम पारितोषिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त अभिवादन
नेवाशातील अल अमीन उर्दू हायस्कूलचा 100 टक्के निकाल

कोपरगाव शहर ः रयत शिक्षण संस्थेचे कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयातील पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेत विद्यालयातील घवघवीत यश संपादन केले असून, इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील एकूण 29 विद्यार्थी प्रविष्ट होते त्यात विद्यालयातील प्रेरणा निलेश कापसे (230 गुण),  तुलसी मच्छिंद्र भिंगारे (228 गुण ), सिद्धी राहुल संवत्सरकर (220 गुण) तर  वेदिका दादासाहेब कुहीले (214 गुण) मिळवत शिष्यवृत्ती पात्र झालेले आहे.
या विद्यार्थ्यांना ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तसेच विद्यालयातील इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत अरमान अन्वर पठाण (184 गुण) गुण मिळवत शिष्यवृत्ती पात्र झाला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक दिनकर माळी यांच्या मार्गदर्शनात इयत्ता पाचवी विभागप्रमुख ललित जगताप व इयत्ता आठवी विभाग प्रमुख सिद्धार्थ बर्डे तसेच विषय शिक्षक सुनील पिंपळे, सचिन डांगे, देविदास झाल्टे, राधाकिसन टाकसाळ, संदीप चव्हाण, गजानन सांगळे या विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कारभारी आगवन, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय निरीक्षक नवनाथ बोडखे, उपविभागीय अधिकारी प्रमोड तोरणे, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, सरपंच रविंद आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य डॉ.सुनील देसाई, सांडूभाई पठाण तसेच करंजी पंचक्रोशीतील सर्व शिक्षण प्रेमी नागरिक ग्रामस्थ यांनी  अभिनंदन केले.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी
इयता 5 वी
हर्षल डोखे जिल्ह्यात 303 वा क्रमांक
हर्षदा ठाकरे जिल्ह्यात 304 वा क्रमांक

इयता 8 वी
विरेन कटारे जिल्ह्यात 77 वा क्रमांक
गायत्री निकम जिल्ह्यात 313 वा क्रमांक

COMMENTS