Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करंदीत विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर रॅलीने स्वागत

शिक्रापूर प्रतिनिधी- करंदी ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने ट्रॅक्टरच्य

सौदी अरेबियाच्या गुंतवणुकीला 100 अब्ज डॉलरचे पाठबळ
उपमुख्यमंत्री जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेल मध्ये असतील – आ. रवी राणा 
फायनान्स कंपनीच्या गुंडागर्दीला कंटाळून कोंढव्यातील रिक्षाचालकाची आत्महत्या

शिक्रापूर प्रतिनिधी- करंदी ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून मिरवणूक काढून स्वागत करण्यात पहिल्या दिवशी नवीन पुस्तके देत स्वागत करण्यात आले आहे. करंदी ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत करण्यात आले, याप्रसंगी मुख्याध्यापक गौतम गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैशाली दरेकर, उपाध्यक्ष माधुरी ढोकले, सदस्य सोमनाथ कदम, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दरेकर, अंकूश पंचमुख, गणेश दरेकर, अंकुश नप्ते, पिराजी नप्ते, बाळू शिंदे, राजू नप्ते, मुरलीधर दरेकर, युवराज नप्ते यांसह आदी शिक्षक, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये बसून मिरवणूक काढत स्वागत करुन मुलांना वह्या व पुस्तके देत खाऊ वाटप करण्यात आले, यावेळी मुख्याध्यापक गौतम गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS