राहुरी ः शिवाजीराव कपाळे यांनी आर्थिक संस्थेसाठी मोठे योगदान दिले आहे महाराष्ट्रातील ही पतसंस्था रुपी आर्थिक चळवळ पतसंस्थांच्या माध्यमातून सुरू र

राहुरी ः शिवाजीराव कपाळे यांनी आर्थिक संस्थेसाठी मोठे योगदान दिले आहे महाराष्ट्रातील ही पतसंस्था रुपी आर्थिक चळवळ पतसंस्थांच्या माध्यमातून सुरू राहावी यासाठी ते कार्यरत आहेत त्यांना सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत माहिती राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट च्या मुख्य शाखेला संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे यांनी सदिच्छा भेट दिली प्रसंगी यावेळी साई आदर्श मल्टीस्टेट चे चेअरमन शिवाजीराव कपाळे, बाळासाहेब ठिगले, श्रीधर शिरसाठ,नानासाहेब वाळुंज, सीए हर्षद जाधव, सीए पंकज महाले आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोल्हे यांनी सांगितले की साई आदर्श मल्टीस्टेट ने आपला वेगळा ठसा जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला आहे शिवाजीराव कपाळे हे आदर्श वत काम करून सहकारी पतसंस्था चळवळीला एक वेगळा संदेश देत आहेत पतसंस्था चळवळीला बळकटी देण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन सर्वांसाठी मोलाचे आहे नक्कीच त्यामुळे जिल्ह्याची पतसंस्था चळवळ आणखी मोठी होईल यात शंका नाही. आभार संस्थेचे मॅनेजर सचिन खडके यांनी मानले.
COMMENTS