Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज समाधि संस्थान त्र्यंबकेश्वर च्या अध्यक्ष पदी कांचनताई जगताप 

त्र्यंबकेश्वर :- संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज समाधि संस्थान,त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळाची विशेष सभा आज ( ता.२१) संस्थानच्या कार्यालयात पार

फेसबुक-इन्स्टाग्राम वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार
संसदेचे कामकाज 3 एप्रिलपर्यंत तहकूब  
Sangamner : नांदुर ते बावपठार, माहुली रस्त्याची दुर्दशा (Video)

त्र्यंबकेश्वर :- संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज समाधि संस्थान,त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळाची विशेष सभा आज ( ता.२१) संस्थानच्या कार्यालयात पार पडली. या सभेत सर्वानुमते संत श्रीनिवृत्तिनाथ संस्थानच्या “अध्यक्ष” पदी ह.भ.प.सौ.कांचनताई जगताप (उकार्डे) तसेच सचिवपदी प्रा.अमर मारुती ठोंबरे यांची व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री महाक्षेत्र पंढरपूर आषाढी पायी वारी पालखी सोहळा २०२४ च्या सोहळाप्रमुख पदी श्री नारायण ज्ञानदेव मुठाळ व संस्थानचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थानचे मावळते अध्यक्ष ह.भ.प.निलेश तुकाराम गाढवे यांच्या अध्यक्षतखाली या सभेचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत संस्थानचे मावळते अध्यक्ष श्री निलेश गाढवे तसेच तसेच मावळते सचिव अँड सोमनाथ ज्ञानेश्वर घोटेकर यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.

        माजी अध्यक्ष श्री निलेश गाढवे तसेच माजी सचिव अँड. सोमनाथ घोटेकर यांनी संस्थानच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ह.भ.प.सौ.कांचनताई जगताप (उकार्डे) तसेच सचिव प्रा.अमर मारुती ठोंबरे व पालखी सोहळा प्रमुख श्री नारायण ज्ञानदेव मुठाळ व प्रसिद्धीप्रमुख ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे या सर्वांचा यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. 

   या बैठकीत संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या जीर्णोद्धार व मंदिर विकास समितीच्या मुख्य समन्वयक पदी श्री निलेश गाढवे तसेच संस्थानच्या विधी समिती मुख्य समन्वयक म्हणुन अँड. सोमनाथ घोटेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीसाठी संस्थानचे सर्व विश्वस्त श्री श्रीपाद महाराज कुलकर्णी,श्री राहुल महाराज साळुंखे, श्री जयंत महाराज गोसावी,श्री योगेश गोसावी,श्री अनिल काका गोसावी,श्री माधवदासजी राठी,सौ.श्रेया देवचक्के , व्यवस्थापक श्री गंगाराम झोले आदी उपस्थित होते.यावेळी प्रसिद्धी प्रमुख ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी सर्वांचे आभार मानले.

    तसेच ही निवड तसे पाहता ऐतिहासिक निवड म्हणता येईल संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्ष पदी इतिहासात पहिल्यांदा महिला किर्तनकार म्हणून ह.भ.प.सौ.कांचनताई जगताप (उकार्डे) यांची निवड म्हटले जात आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच स्तरातून संस्थानचे कौतुक केल्या जात आहे यावेळी नाशिक जिल्ह्यातील अनेक महिला किर्तनकार वारकरी व विशेषतः त्र्यंबकेश्वर नगरीतील सर्वच क्षेत्रातील मान्यवर व वारकरी उपस्थित होते.

COMMENTS