Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल काकडी या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2023-2

ठेकेदारांच्या आंदोलनामुळे मनपाची विकासकामे ठप्प
वोट बँक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांचा बळी ः अजित नवले
ते मेसेज व्हायरल केले तर…याद राखा

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल काकडी या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2023-24 चा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी दिली आहे. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल काकडी या विद्यालयाचे एकूण 43 विद्यार्थी मार्च 2024 मध्ये एस.एस.सी.परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होवून कु.मोहिनी धनराज सोनवणे या विद्यार्थिनीने शे.83% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला असून कु.साईशा कैलास डांगे हिने 82.60% गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर कु. प्रिया धोंडीराम सोनवणे हिने 80% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्‍वस्त आमदार आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS