Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेत्रदीपक लढतींनी गाजला कै.विष्णू उस्ताद आखाडा

माऊली कोकाटेंना मानाची गदा आमदार शिंदेंच्या हस्ते प्रदान

जामखेड ः कै.विष्णू उस्ताद काशीद आखड्याने नागपंचमीची ओळख बदलून मल्लांना कुस्तीच एक चांगले मैदान उपलब्ध करून दिले असे मत आ. प्रा. राम शिंदे यांनी व

शिवसेना नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना हटवले
समता स्कूलची दहावीच्या उज्जवल निकालाची परंपरा कायम
कॉंग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, सविता मोरे व ओंकार लेंडकर यांचा भाजपात जाहीर प्रवेश

जामखेड ः कै.विष्णू उस्ताद काशीद आखड्याने नागपंचमीची ओळख बदलून मल्लांना कुस्तीच एक चांगले मैदान उपलब्ध करून दिले असे मत आ. प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांच्या शुभ हस्ते मानाची पहिली कुस्ती लावली गेली, यावेळी ते बोलत होते. मी सगळी कामे बाजूला ठेऊन मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी आवर्जून दरवर्षी याठिकाणी उपस्थित राहतो असेही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.
नागपंचमी यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षी ही अजय दादा काशीद मित्र परिवाराच्या वतीने कै.विष्णू उस्ताद काशीद यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. पहिली मानाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उप महाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यात अतिशय रोमहर्षक झाली सुमारे 35 मिनिटे चाललेल्या या कुस्तीत शेवटी पॉइंट वरती माऊली कोकाटे यांनी मानाची गदा पटकावली या लढतीने संपूर्ण कुस्ती शौकिनांचा श्‍वास रोखून धरला होता.
          या मैदानासाठी महाराष्ट्रासह पर राज्यातून मल्लांनी हजेरी लावली होती प्रमुख अतिथी मदेअश्‍वलिंग संस्थान पिंपळवाडी ह. भ. प. महादेवा नंद भारती महाराज, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री रविकांत तुपकर, माजी सभापती भगवान मुरूम कर, मार्केट कमिटी सभापती शरद कार्ले, मधुकर राळेभात, पवन राळे भात, मराठा गौरव युवराज भाऊ काशीद, स्वातीताई काशीद, संध्या सोनवणे, सारोळा गावच्या सरपंच रीतुताई काशीद, श्याम भैय्या धस, अमित चिंतामणी, सूर्यकांत मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे य या वर्षी ही रात्री उशिरा पर्यंत आखाडा चालू होता शेवटची कुस्ती संपेपर्यंत मैदान खचा खच भरलेले होते. या आखाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे महिला कुस्त्याही लागल्या गेल्या तसेचअनेक महिला भगिनी कुस्त्या पाहण्यासाठी मैदानात आवर्जून उपस्थित असल्याचे दिसले. कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठानच माध्यमातून या आखाडा सोबतच अनेक सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवले जातात त्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS