Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड येथील चौकाचे कै.शंकरभाऊ वाणी नामकरण

आमदार जगताप यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण

अहमदनगर प्रतिनिधी- महापालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड येथील वाणीनगर येथे प्रगतशील शेतकरी कै.शंकरभाऊ वाणी यांचे नाव देण्यात आले. या नामकरण फलकाचे अन

मित्रासोबत फिरायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणीवर गँगरेप | पहा ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | Lok News24
मढी येथील मुस्लिम समाजाला संरक्षण मिळावे : ग्रामस्थांची मागणी
बोठेच्या नगर मुक्कामाचा उलगडा अजून गुलदस्त्यातच ; दोषारोपपत्राचे काम अंतिम टप्प्यात

अहमदनगर प्रतिनिधी- महापालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड येथील वाणीनगर येथे प्रगतशील शेतकरी कै.शंकरभाऊ वाणी यांचे नाव देण्यात आले. या नामकरण फलकाचे अनावरण महापालिका व शंभुराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सुरेश बनसोडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वाणी, प्रशांत शिंदे, रवी तरोटे, किरण लुंगसे, विनोद साळवे, विशाल पवार, संतोष वाणी, राम वाणी, शेखर तुंगार, राजू तागड, अच्युत गलांडे, नगरसेवक सागर बोरुडे, बसपाचे माजी शहराध्यक्ष संतोष जाधव, मोहन वाणी, सुरेश बनसोडे आदी नागरिक उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, महापुरुष, ज्येष्ठ व्यक्तींचे पुतळे व नावाने त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळत असते. शहरात अनेक चौकांना महापुरुषांचे व ज्येष्ठांचे नाव देण्यात आलेले आहे. तर प्रोफेसर चौकात या उद्देशाने छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. भावी पिढीला महापुरुषांच्या विचारातून स्फूर्ती व दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर शंकरभाऊ वाणी यांचे सामाजिक कार्य जवळून पाहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  
प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वाणी यांनी चौकाला कै. शंकरभाऊ वाणी नाव देण्यासाठी आमदार जगताप व नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी महापालिकेत विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

COMMENTS