Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती लाभासाठी राईट टू गिव्ह अप पर्यायासाठी 30 जूनची मुदत

नाशिक - आदिवासी विकास विभागांतर्गत तालुक्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विवि

पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विवाहितेवर अत्याचार करणार्‍या माजी सैनिकाला कारावास
अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघांचा मृत्यू

नाशिक – आदिवासी विकास विभागांतर्गत तालुक्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तींचा लाभ देण्यासाठी शासनाकडून सन 2018-19 पासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर राईट टू गिव्हअप पर्याय निवडलेल्या अर्जदारांना हा पर्याय पुन्हा निवड करण्याबाबत 30 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिकचे प्रकल्प अधिकारी अरूणकुमार जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या नाशिक प्रकल्प कार्यालयांतर्गत नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड, येवला, दिंडोरी, इगतपुरी आणि पेठ या तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तींचा लाभ देण्यात येतो.

महाडीबीटी पोर्टलवर संस्थेच्या Principal लॉगिनमध्ये ही सुविधा 30 जून 2024 पर्यंत उपलब्ध राहणार असून ज्या अर्जदार विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप पर्याय निवडला असेल, अशांनी राईट टू गिव्ह अप पर्याय पुनर्निवडीसाठी संबंधित संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे.

COMMENTS