राज ठाकरेंच्या अटक वॉरंटवर शुक्रवारी निर्णय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरेंच्या अटक वॉरंटवर शुक्रवारी निर्णय

सांगली : रेल्वे भरती प्रक्रिया आणि त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना झालेल्या अटकेनंतर मनसैनिकांकडून २००८ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. त्या प्रकरण

शिर्डी शहराचे रूपडे बदलणार
आरबीआयची 4 बँकांवर प्रशासकीय कारवाई
वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांना देणार बेसिक लाईफ सपोर्ट स्कील्स चे प्रशिक्षण             

सांगली : रेल्वे भरती प्रक्रिया आणि त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना झालेल्या अटकेनंतर मनसैनिकांकडून २००८ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. त्या प्रकरणी पुढे ठाकरे यांच्याविरोधात शिराळा न्यायालयाने अटक वॉरंट काढले. त्यानंतर इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात ठाकरे यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करून त्यांना जामीन मंजूर करावा, यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आता सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने यावर शुक्रवारपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे कोरोना बाधित ठाकरेंना यांना दिलासा मिळणार की न्यायालयात हजर व्हावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे यांच्या बाजूने ॲड. विजय खरात, ॲड. धीश कदम, ॲड. आनंद चव्हाण यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, या आंदोलनात ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. त्यामुळे या खटल्यातून त्यांचे वगळण्यात यावे, सध्या ते कोरोनाग्रस्त असून त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. त्यामुळे ते सुनावणीस हजर राहू शकत नाहीत. तसेच राज्य सरकारनेही जनहितासाठी झालेल्या आंदोलनाचे खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे अटक वॉरंट रद्द करून ठाकरे यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी केली.

COMMENTS