Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकनेते खासदार निलेशजी लंके च्या निवडीने दहिगावने गटात जल्लोष

शहरटाकळी - शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला (शरद पवार गट) समजल्या जाणऱ्या दहिगाव ने गटातील शहरटाकळी सह  रांजणी,भाविनिमगाव, मज

बारामतीचा गड उद्धवस्त करणे इतके सोपे नाही.
निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देणार
शिवपुत्र संभाजी महानाट्याचा राजकारणाशी संबंध नाही

शहरटाकळी – शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला (शरद पवार गट) समजल्या जाणऱ्या दहिगाव ने गटातील शहरटाकळी सह  रांजणी,भाविनिमगाव, मजलेशहर, ढोरसडे ,आंत्रे, येथे लोकनेते खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या निवडीने फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

दहिगाव ने गटातील शहरटाकळी सह परिसरातील गावमध्ये लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या निकालाची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचलेली होती, सकाळपासूनच कार्यकर्ते टीव्ही, मोबाईल, वर निवडणूक निकाल पाहण्यात मग्न होते.कार्यकर्त्यांत आपलाच उमेदवार विजयी होणार या चर्चेला उधाण आले होते . भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी   मतमोजणीच्या सुरुवातीला घेतलेली मतांची आघाडी बाराव्या फेरी नंतर कमी होत गेली व त्यानंतर खासदार निलेशजी लंके साहेब शेवटपर्यंत आघाडीवर राहिले , यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढत होता कार्यकर्त्यांनी खासदार निलेशजी  लंके साहेब यांच्या निवडीचे गुलालाची उधळण करून ,फटाके फोडून व पेढे वाटून जोरदार स्वागत केले यावेळी शिवाजीराव खराडे, खासदार निलेश लंके साहेब  मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब मडके, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब राऊत, प्रदीप गवळी, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामचंद्र गिरम,  रविंद्र मडके, सिताराम कुंडकर , मोहन कोल्हे, दिलीप कोल्हे,भाऊराव गिरम, रामदास चव्हाण, महेश भालेराव सह कार्येकर्त्यानी जोरदार स्वागत केले आहे.

COMMENTS