Homeताज्या बातम्यामनोरंजन

Jr. NTR च्या फॅन्सचा धिंगाणा, थिएटरला लागली आग

ज्युनियर एनटीआर हे साऊथ सिनेमातील अशा कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांचे फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. चाहते त्याच्या चित्रपटांचा जल्लोष करत असतात. ज्युन

नाशिकमध्ये कोब्रानेच कोब्राला गिळले
किल्ल प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही : ना. एकनाथ शिंदे
आलिया भट्टने वांद्रे येथे कोट्यवधींचे दोन घर खरेदी केले

ज्युनियर एनटीआर हे साऊथ सिनेमातील अशा कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांचे फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. चाहते त्याच्या चित्रपटांचा जल्लोष करत असतात. ज्युनियर एनटीआरने 20 मे रोजी त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अनेक सिनेतारकांनी आणि चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर ज्युनियर एनटीआरच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा 20 वर्षे जुना चित्रपट ‘सिम्हादारी’ पुन्हा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट पाहताना ज्युनियर एनटीआरचे चाहते बेकाबू झाले आणि त्यांनी एका सिनेमागृहाला आग लावली.

ज्युनियर एनटीआरचे चाहते विजयवाडा येथील एका थिएटरमध्ये त्याचा ‘सिम्हादारी’ चित्रपट पाहत होते. यादरम्यान, चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याचा वाढदिवस सिनेमागृहात साजरा करण्यास सुरुवात केली आणि फटाके फोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे सिनेमा हॉलमध्ये आग लागली. या दुर्घटनेत हॉलमधील काही सीटचे नुकसान झाले आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS