Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारांनी नव्या संधीचा शोध घेतला पाहिजे – वसंत मुंडे

पत्रकार संघाचे वार्षिक पदाधिकारी अधिवेशन उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी ः संघटनेत जबाबदारी स्वीकारलेल्या पदाला आपल्या क्षमता वापरुन न्याय देत वृत्तपत्र क्षेत्राची प्रतिमा उंचावण्यासाठी पदाधिकार्यांनी

वारकर्‍यांना मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी नियोजन करा
कोरोनामुळे शहर बँकेच्या वसुलीवर परिणाम ; यंदा 1 कोटीचा नफा, ऑनलाईन वार्षिक सभा उत्साहात
रुईगव्हाणच्या सरपंचपदी इंदिरा निलेश पवार बिनविरोध

कोपरगाव प्रतिनिधी ः संघटनेत जबाबदारी स्वीकारलेल्या पदाला आपल्या क्षमता वापरुन न्याय देत वृत्तपत्र क्षेत्राची प्रतिमा उंचावण्यासाठी पदाधिकार्यांनी काम करावे. अडचणीतील पत्रकारांना तो कोणत्या संघटनेत काम करतो हे न पाहता त्याला मदत करण्याची भूमिका घ्यावी असे सांगुन वृत्तपत्र व्यवसायाचे अर्थकारण बिघडल्यामुळे पत्रकारांनी नव्या संधींचा शोध घेतला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. तर पदाधिकार्‍यांनी केवळ ओळखपत्रापुरते काम न करता सामाजिक बांधिलकी जपावी. तरुण पत्रकारांना संधी द्यावी असे आवाहन सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वार्षिक पदाधिकारी अधिवेशन शिर्डी (जि.अहमदनगर) येथे शुक्रवार 10 मार्च रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांच्या उपस्थित झाले. राज्यभरातील संघटनेचे विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका, शहर असे पाचशेहून अधिक पदाधिकारी सहभागी झाले होते. मागील वर्षभरातील कार्य अहवाल जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला. यावेळी बोलताना वसंत मुंडे यांनी संघटनेचे महत्व स्पष्ट करत संघटनेत स्वीकारलेली पदाची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आपल्या क्षमतांचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. तर सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांनी कोरोना काळात आणि अतिवृष्टीत अडचणीतील लोकांना मदत करण्यासाठी मोठी भूमिका निभावली. सामाजिक बांधिलकी म्हणून राज्य पत्रकार संघ आपत्तीच्या काळात मदतीसाठी पुढे असतो. पत्रकाराचा अचानक मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाते. तर पत्रकार आजारी असल्यानंतरही त्यांना मदतीचा हात दिला जातो. सुखात नाही पण दुःखात संघ कायम पत्रकारांच्या पाठीमागे असतो. त्यामुळे राज्यभरातील पदाधिकार्‍यांनी भविष्यातही याच पध्दतीने काम करुन आपली ओळख निर्माण करावी असे त्यांनी सांगितले. मागील वर्षभरात उत्कृष्ट काम करणार्‍या विभागीय आणि जिल्हाध्यक्षांचा विशेष सन्मान करण्यात आला. परभणीचे विजयकुमार कुलदीपके यांनी आजारपणात पत्रकारांना केंद्र सरकारच्या योजनेतून मदत मिळवून दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव जळगाव येथील मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार दिगंबर महाले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब देशमुख, निळकंठ कराड, मराठवाडा विभागीय संपर्क प्रमुख कुंडलिक वाळेकर विदभ प्रमुख निलेश सोमाणी. नागपूर विभागीय अध्यक्ष महेश पानसे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रविण सपकाळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, पश्‍चिम विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, पश्‍चिम विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, उपाध्यक्ष बाजीराव फरकाटे अहमदनगर जिल्हा निवड समिती अध्यक्ष सोमनाथ काळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा प्रदेश सचिव डॉ. विश्‍वासराव आरोटे यांनी साईबाबांची मूर्ती, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी शासनाचे वतीने ज्येष्ठ पत्रकारांसाठी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सन्मान पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाठपुराव्यामुळे त्या योजनेच्या निधीमध्ये वाढ करुन अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद केल्याबद्दल अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संघाच्या वतीने आभार मानण्यात आले व त्यांना धन्यवादही देण्यात दिले.

COMMENTS