Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारांनी चांगल्या वाईट गोष्टी मांडण्याचे धाडस करावे -आमदार मोनिका राजळे

पाथर्डी प्रतिनिधी - पत्रकारांनी तटस्थ भूमिका घेत चांगल्या वाईट गोष्टी मांडण्याचं धाडस दाखवणे हा पत्रकरितेचा भाग आहे.शेवगाव-पाथर्डी मध्ये जाती प

भाजपने नाविन्यपूर्ण योजनांतून केला देशाचा विकास ः आमदार मोनिका राजळे
व्यावसायिक शिक्षण काळाची गरज ः आमदार मोनिका राजळे
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारेवरच वाटचाल सुरु – आमदार मोनिका राजळे

पाथर्डी प्रतिनिधी – पत्रकारांनी तटस्थ भूमिका घेत चांगल्या वाईट गोष्टी मांडण्याचं धाडस दाखवणे हा पत्रकरितेचा भाग आहे.शेवगाव-पाथर्डी मध्ये जाती पाती धर्माचे राजकारण केले जात नसून एकमेकांचा सन्मान करत चांगल्या वातावरणात वावरत आहोत.. पत्रकार दिनानिमित्त शहरातील अप्पासाहेब राजळे कार्यालय येथे पत्रकाराचा सन्मान सोहळ्यात पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे बोलत होत्या.यावेळी पाथर्डी शेवगाव तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार राजळे यांनी म्हटले की,समाजामधील घटकांना विविध माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार काम करत असतात.कुठलाच माणूस परिपूर्ण नसतो आपण सर्वांनी एकमेकांना गुणदोषासहित स्वीकारलेले असते त्यामुळे मनात कधीच कोणाबद्दल असूया नसते.ज्या त्या क्षणाला त्या गोष्टी एकमेकांनी सोडून दिल्या पाहिजे.कुठल्या गोष्टीला न्याय दिला पाहिजे,कोणत्या गोष्टीकडे शासनाचे लक्ष वेधले पाहिजे हे पत्रकार आपल्या बातमीदारीतून मांडत असतो. सध्या सोशल माध्यमातून जगात काय चाललंय हे अगदी त्वरित मोबाईल कळत असलं तरी आज ही काही मंडळीचा सकाळचा पेपर वाचल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही.अशी वैभवशाली परंपरा पत्रकारितेला आहे.आज अनेक तरुण पत्रकार हे या क्षेत्रात येत आहे.त्यांनी आदर्श पत्रकाराच्या  अनुभवातुन पत्रकारितेत पुढे जावे.

COMMENTS