Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूल येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा

पत्रकार हा समाजाचा खरा दर्पण-बोडके सरदेगलूर । प्रतिनिधीमहाराष्ट्र शासनाने मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानि

शिक्षण विभागात ‘पेन्शन थांबवा – कमिशन चालवा’ योजना?
प्रभाग सहामध्ये शीला भवरे यांच्या निष्क्रियतेचा मुद्दा चांगलाच गाजतोय
महानगरपालिका सक्षम पद्धतीने हाताळणारी भाजपची पहिली महिला महापौर कोण होणार ?

पत्रकार हा समाजाचा खरा दर्पण-बोडके सर
देगलूर । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे. मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ 6 जानेवारी 1832 रोजी सुरू करून त्यांनी पत्रकारितेची भक्कम पायाभरणी केली. जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचावी या उद्देशाने मराठी भाषेतून सुरू झालेल्या ‘दर्पण’मुळेच आज पत्रकारितेचे महत्त्व अधिक ठळकपणे दिसून येते.
या दिवसाचे औचित्य साधून दि. 8 जानेवारी 2026 रोजी देगलूर शहरातील संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूल येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देगलूर तहसीलदार भरत सूर्यवंशी, देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्याम वद्देवार तसेच देगलूर शहरातील वरिष्ठ पत्रकार यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्रास दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी देगलूर शहर व तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव, संपादक तसेच विविध पत्रकार संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार दिनानिमित्त संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलचे संस्थापक बोडके सर यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा पुष्पहार व लेखणी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पत्रकार दिन का साजरा केला जातो, पत्रकारितेचे सामाजिक महत्त्व काय आहे, याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोडके सर म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजाचा खरा दर्पण आहे. समाजातील प्रश्न, सत्य आणि वास्तव लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतो. सत्कार समारंभानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक शंकर बोडके सर व स्वाती बोडके यांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS