Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

जिओची व्हॅलेंटाईन बंपर ऑफर

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने खासकरून व्हॅलेंटाईन डे आठवड्याच्या निमित्ताने अनेक विशेष प्रीपेड रिचार्ज ऑफर जाहीर केल्या आहेत. विशेष प्रीपेड रिचार्

फ्री मध्ये Netflix, Prime Video बघू इच्छित असाल तर जिओ चा बेस्ट ऑफर
अबब !! या किंमतीची ओला एस सिंगल चार्जिंगनंतर धावते 120 किमी
देशातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार सादर

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने खासकरून व्हॅलेंटाईन डे आठवड्याच्या निमित्ताने अनेक विशेष प्रीपेड रिचार्ज ऑफर जाहीर केल्या आहेत. विशेष प्रीपेड रिचार्ज अंतर्गत, ग्राहकांना अतिरिक्त डेटा, फ्लाइट बुकिंग आणि मोफत कूपन यांसारखे फायदे मिळणार आहेत. व्हॅलेंटाईन डे स्पेशल प्रीपेड ऑफर अंतर्गत, ग्राहक 14 फेब्रुवारीपर्यंत रिचार्ज करून विशेष ऑफरचा लाभ घेऊ शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की या ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत आणि जिओने आत्तापर्यंत एक्सपायरी डेट जाहीर केलेली नाही. हे विशेष प्रीपेड रिचार्ज MyJio अँपच्या मदतीने केले जाऊ शकतात.

व्हॅलेंटाईन डे स्पेशल प्रीपेड रिचार्ज- रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी टेल्कोने अद्याप अंतिम तारीख ठरवलेली नाही. म्हणजेच, वापरकर्ते 14 फेब्रुवारीनंतरही (ऑफर बंद होण्यापूर्वी) याचा लाभ घेऊ शकतील. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना व्हॅलेंटाईन डेचा लाभ 349 रुपये, 899 रुपये आणि 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर उपलब्ध असेल.

कंपनीच्या घोषणेनुसार, 10 फेब्रुवारी रोजी किंवा त्यानंतर रिचार्ज पूर्ण करणार्‍या सर्व नोंदणीकृत Jio ग्राहकांना व्हॅलेंटाईन डे स्पेशल प्रीपेड रिचार्ज अंतर्गत काही अतिरिक्त फायदे दिले जातील. वापरकर्त्यांना एकूण चार प्रकारे फायदे मिळतील. MyJio अॅपच्या मदतीने 349 रुपये, 899 रुपये आणि 2999 रुपयांचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त 12 GB 4G डेटाचा लाभ मिळेल, जो ते 30 दिवसांच्या आत कधीही रिडीम करू शकतात.

COMMENTS