Jio ची धमाकेदार ऑफर… इंटरनेटचा डेटा संपला तरी आता चिंता नाही… | Reliance Jio (Video)

Homeताज्या बातम्यादेश

Jio ची धमाकेदार ऑफर… इंटरनेटचा डेटा संपला तरी आता चिंता नाही… | Reliance Jio (Video)

Reliance Jio ने ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर देऊ केली आहे. तुमचा रिचार्ज संपलेला असताना तुमच्या मोबाईलचा डेटा पॅक संपला तरी आता टेन्शन घेण्याचे काम र

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र अकॅडमीच्या दोन विद्यार्थिनींची निवड
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे 100 टक्के लसीकरण आवश्यक
कोल्हापूरात तिसर्‍या लाटेत रुग्णसंख्या दीडपटीने वाढणार

Reliance Jio ने ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर देऊ केली आहे. तुमचा रिचार्ज संपलेला असताना तुमच्या मोबाईलचा डेटा पॅक संपला तरी आता टेन्शन घेण्याचे काम राहिलेले नाही. जिओ कंपनीने त्यांच्या ग्राहकांना आता एक जीबी इमर्जन्सी डेटा प्लॅन देऊ केला आहे. तुम्ही MyJio अॅपद्वारे या प्लॅनचा पाच वेळेस फायदा घेऊ शकता. त्याचे पैसे तुम्हाला नंतर भरावे लागतील. म्हणजेच तुमच्याकडे पैसे नसले तरीही तुम्हाला नेट पॅक टाकता येऊ शकतो. MyJio अॅपच्या इमर्जन्सी डेटा लोन टॅबमधून तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. 

दैनंदिन डेटा संपल्यानंतर तुम्ही हा डेटा वापरू शकता. तो परत करण्यासाठी कंपनीने कोणतीही मुदत ठेवलेली नाही. म्हणजेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार या पॅकचे पैसे भरू शकता. एक युजर 1GB चा इमर्जन्सी पॅक 5 वेळा घेऊ शकतो. या 1GB डेटाची किंमत 11 रुपये ठेवण्यात आली आहे. एका वेळी फक्त 1GB डेटा वापरता येणार आहे. तर कशा प्रकारे या ऑफरचा लाभ घेता येईल पाहुयात… 

यासाठी तुम्हाला सर्वप्रथम MyJio अॅपवर जावे लागेल. येथे तुम्हाला वरच्या डाव्या कोपर्‍यात असलेला थ्री-डॉट मेनू निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला Emergency Data Loan च्या पर्यायावर जावे लागेल. यानंतर, तुम्ही Get emergency data च्या पर्यायावर जाऊन ‘Activate now’’ वर क्लिक करून या सुविधेचा लाभ घेऊ शकता. 

COMMENTS