Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिजामाता कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, माजलगावचा 100 टक्के निकालपहिली बॅच डॉक्टर म्हणून रुग्णसेवेसाठी सज्ज

माजलगाव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या बी.पी.टी.  अंतिम वर्षाच्या परीक्षेत माजलगाव विकास प्रति

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन
भारतीय बनावटीच्या सफर मॉडेलला जागतिक स्तरावर मान्यता
कृष्णा कारखान्यास उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

माजलगाव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या बी.पी.टी.  अंतिम वर्षाच्या परीक्षेत माजलगाव विकास प्रतिष्ठान संचलित जिजामाता कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, माजलगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लावला आहे. महाविद्यालयाच्या पहिल्याच बॅचने हे घवघवीत यश मिळवल्याने संस्थेसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या परीक्षा उत्तीर्ण होत आपले शैक्षणिक प्रशिक्षण पूर्ण केले असून ते आता डॉक्टर म्हणून समाजातील रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या महाविद्यालयाच्या पहिल्याच बॅचने मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद मानले जात आहे.या यशानिमित्त महाविद्यालयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन, शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई प्रकाश सोळंके यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना घडविणार्‍या शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आरोग्यसेवेच्या क्षेत्रात संवेदनशीलता, कौशल्य आणि समर्पणाने काम करण्याचे आवाहनही केले.जिजामाता कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या या उल्लेखनीय यशामुळे माजलगाव शहरासह बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे. पुढील काळातही अशाच प्रकारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन आरोग्य क्षेत्रासाठी सक्षम आणि कुशल फिजिओथेरपिस्ट घडविण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पॉल राज, व्हॉइस प्रिन्सिपल सिमुलिया डीन्जू मॅडम, ऑफिस सुप्रीटेंडंट वाघ सर, शिंदे सर, इरफान पठाण सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS