Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेऊर कुंभारी गावठाण जमीन घरकुल लाभार्थ्यांसाठीच

आमदार आशुतोष काळे यांची ग्रामस्थांना ग्वाही

कोपरगाव ः कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीला गावठाणसाठी मिळालेली शेती महामंडळाची जागा हो कोणत्याही परिस्थितीत पुन्हा शेती महामंडळाकड

वेस-सोयगाव तलावाच्या 9.98 कोटींच्या कामास मान्यता
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांवर अन्याय
जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात आमदार काळेंची याचिका

कोपरगाव ः कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीला गावठाणसाठी मिळालेली शेती महामंडळाची जागा हो कोणत्याही परिस्थितीत पुन्हा शेती महामंडळाकडे जाणार नाही. सदरची जमीन घरकुल लाभार्थ्यांसाठीच राहील व हि जमीन घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष महेंद्र वक्ते यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील घरकुल लाभार्थ्यांनी नुकतीच आमदार आशुतोष काळे यांची भेट घेवून घरकुलासाठी मिळालेली शेती महामंडळाची गावठाण जमीन ग्रामपंचायतीच्याच  ताब्यात राहून ती जमीन घरकुल लाभार्थ्यांना मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांना लेखी निवेदन देवून आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी त्यांनी घरकुल लाभार्थ्यांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेवून ही जमीन पुन्हा शेती महामंडळाकडे जावू न देता ही गावठाणची जमीन घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्‍वासित केले. तसेचजेऊर कुंभारी हे गाव गोदावरी नदीकाठी असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी घर बांधता यावे यासाठी जवळपास त्रेचाळीस वर्षापूर्वी शेती महामंडळाने ही जमीन जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीला दिलेली आहे. गोदावरी नदीला महापूर आल्यास होणारी वित्त व जीवित हानी टाळण्यासाठी या जमिनीचा उपयोग होणे गरजेचे आहे. त्यामुळे या जमिनीचा उपयोग हा प्राधान्य क्रमाने घरकुल लाभार्थ्यांना होणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी ही गावठाणची जागा जेऊर कुंभारीच्या घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आ. आशुतोष काळे सांगितले आहे.त्यामुळे सर्व घरकुल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करून आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले असल्याचे महेंद्र वक्ते यांनी सांगितले आहे.

COMMENTS