Homeताज्या बातम्यादेश

लोकसभा अध्यक्षपदासाठी जेडीयूची तयारी

चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत सभापती पदावरून एनडीए आणि इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये शाब्दिक हल्ल

निवडणूक : लोकशाहीची की भांडवलशाहीची?
“फडणवीस…! डबक्यात बेंडुक असतात, त्यात उतरू नका” | LOK News 24
पवनक्क्यांचे साहित्य चोरणारे नऊजणांना अटक

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत सभापती पदावरून एनडीए आणि इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये शाब्दिक हल्ल सुरु झाले आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या टीडीपीला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले आहेत. दुसरीकडे जेडीयूने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी त्यागी यांनी सांगितले की, काँग्रेस जे काही करत आहे ते लक्ष विचलित करत आहे, ते चुकीचे आहे. कारण परंपरा अशी आहे की सत्ताधारी आघाडीतील सर्वात मोठा पक्षच स्पीकरबाबत निर्णय घेतो. भाजप कोणताही निर्णय घेईल, आम्ही त्याचे समर्थन करू.

सभापतीपदावर टीडीपीची भूमिका काय? – लोकसभा अध्यक्षांबद्दल, टीडीपीने म्हटले की सत्ताधारी आघाडीने सभापती पदासाठी उमेदवार उभा केला पाहिजे. टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते पट्टाभी राम कोमरेड्डी यांनी सांगितले की, सभापती पदाच्या निवडणुकीबाबत एनडीएचे सहयोगी एकत्र बसतील आणि सभापती पदाचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय घेतील. एकदा एकमत झाले की आम्ही तो उमेदवार उभा करू आणि टीडीपीसह सर्व मित्र पक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील.

COMMENTS