Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावणार ‘जयंती फलक’: मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १० :- महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जा

तलाठी भरती परीक्षेचा घोळ संपेना
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रा
पत्नीऐवजी दिला भलत्याच पुरुषाचा मृतदेह | LOK News 24

मुंबई, दि. १० :- महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. या कार्यक्रमांच्या वेळी सर्वसामान्य जनतेस महापुरुषांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी शासनाने थोर महापुरुषांची जयंती असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलकही लावण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

आज त्याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित झाला आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये येथे त्यांच्या प्रतिमेसह जीवन चरित्राची माहिती देणारे फलकही लावण्यात येतील. तसेच ‘जयंती फलक या शीर्षकाखाली https://gad.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

COMMENTS