अहिल्यानगर : न्यू आर्टस् येथे जापनीज सेन्सयी हिरायमा आझुमी यांनी बीबीए विभागास शैक्षणिक संयुक्त प्रोग्राम अंतर्गत भेट दिली. अहमदनगर जिल्हा मराठा

अहिल्यानगर : न्यू आर्टस् येथे जापनीज सेन्सयी हिरायमा आझुमी यांनी बीबीए विभागास शैक्षणिक संयुक्त प्रोग्राम अंतर्गत भेट दिली. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे यांनी या शैक्षणिक संयुक्त भेटीचे कौतुक केले असून ग्रामीण भागातील युवक युवतींच्या रोजगार विषयी पाहिलेले स्वप्न अधिक वेगाने पूर्ण होईल असे सेन्सयी हिरायमा आझुमी यांच्याशी चर्चा केल्यानंतर नमूद केले.
न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय बीबीए अंतर्गत इंटरनॅशनल बिझनेस हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम राबविला जातो. या विद्यार्थ्यांना जापनीज भाषा हा विषय कंपल्सरी विषय म्हणून शिकवला जातो. विद्यार्थ्यांना या भाषेचा उपयोग त्यांच्या करिअरच्या प्रोग्रेससाठी उपयोगी ठरावा या उद्देशाने जपान येथील सेन्सयी हिरायमा आझुमी यांना महाविद्यालयाने भेटीचे आमंत्रण दिले होते असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब सागडे यांनी विषद केले. हा ज्ञानवर्धक मेळावा केवळ मनांची बैठक नव्हती तर तो अत्याधुनिक भाषा संवर्धन व सामाजिक दृष्टिकोनाचा मिलाप होता. यादरम्यान विभागाचे विभाग प्रमुख डॉ मंगेश वाघमारे यांनी विभाग करत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती सेन्सयी हिरायमा आझुमी यांना दिली. यावेळी उगवत्या सूर्याची भूमी असलेल्या जपानच्या भौगोलिक, तांत्रिक, सामाजिक विषयांवर परस्पर संवाद विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तराने प्रेरित झाला. यावेळी सेन्सयी हिरायमा आझुमी यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांना त्यांचे बोलणे समजावे म्हणून प्रा. वैदही पारनाईक यांनी दुभाषी म्हणून काम केले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रगती पाठक, तनिषा काब्रा, संस्कृती बारस्कर, राजनंदिनी घाडगे यांनी वेगवेगळे पोस्टर पाहुण्यांसमोर सादर करून भारतीय व जापनीज संस्कृतीचे दर्शन घडविले. प्रा. डॉ मंगेश वाघमारे तसेच प्राध्यापक डॉ सतीश जगताप यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात तेथील रोजगार संबंधीच्या संधी या विषयी माहिती जाणून घेतली. यावेळी जापानी भाषेचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी अस्खलित जपानी भाषेतून प्रश्न विचारले व आपली स्वतःची ओळख जापनीज भाषेत अतिथींना करून दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. राहुल थोरात, प्रा अनिता पेटकर, प्रा. शामल जाधव, प्रा. नम्रता ठाकर, प्रा. रूपाली मिस्कीन यांनी प्रयत्न केले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. अभिजीत सातभाई यांनी केले.
COMMENTS