Homeताज्या बातम्यादेश

जनशताब्दी एक्सप्रेसला भीषण आग

ओडिशा प्रतिनिधी - जनशताब्दी एक्सप्रेसला आग लागली आहे. या भीषण दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी ट्रेनच्या डब्याला आ

गुढीपाडव्यादरम्यान मंदिरात भक्तांसमोर पुजाऱ्याचा खून
राष्ट्रवादी पक्षाच्या (अजितदादा गट)  त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष पदी बंडू खोडे 
बीडीओंच्या संपामुळे रोहयोची कामे ठप्प

ओडिशा प्रतिनिधी – जनशताब्दी एक्सप्रेसला आग लागली आहे. या भीषण दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हावडा-जनशताब्दी एक्स्प्रेसने कटक रेल्वे स्थानकावर थांबण्यासाठी ब्रेक लावताच डब्याच्या चाकांमधून धूर येऊ लागला. त्यानंतर अचानक आगीच्या ज्वाला वाढू लागल्या. ओडिशातील कटक रेल्वे स्थानकावर अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. कटक रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की आग लागल्यानंतर माहिती अग्निशमन दलाला तातडीने कळवण्यात आलं. घटनास्थळी पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे ने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘ब्रेक-बाइंडिंगमुळे 12074 भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी 6.30 वाजता कटक रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. ब्रेक शू चाकापासून वेगळे केल्यानंतर ट्रेनने कटक येथून रात्री 7.15 च्या सुमारास पुढे रवाना झाली. ही घटना आज सकाळी घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्टेशनवर एक ट्रेन उभी आहे, तिच्या एका डब्याच्या खालच्या भागातून धूर निघत असल्याचे दिसून येते. काही लोक अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझवण्यात व्यस्त आहेत. ब्रेक शू चाकापासून वेगळे न होण्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. डब्यात आग लागली नसल्याचे पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे. याआधी सप्टेंबरमध्ये गुजरातमधील वलसाडजवळ तिरुचिरापल्ली-श्रीगंगानगर हमसफर एक्स्प्रेसच्या पॉवर कोचमध्ये आग लागली होती.

COMMENTS