Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राक्षसवाडीचे जनता विद्यालय कर्जत तालुक्यात प्रथम

विद्यालयातील कर्मचार्‍यांचा नागरिक सत्कार

कर्जत : राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा- दोन अभियान राबविण्यात ये

लाडकी बहिण योजनेसाठी पोस्ट पेमेंट बँक खाते उघडण्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवळ्या चोरी
तोतया व्यक्ती उभी करून केले खरेदीखत

कर्जत : राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा- दोन अभियान राबविण्यात येत आहे. या स्पर्धात्मक अभियानात माध्यमिक विभागात कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथील जनता विद्यालयाने कर्जत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये शाळेला तीन लाख रुपयांचा निधी बक्षीस रूपाने दिला जाणार आहे. त्याबाबत संस्था तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालकांच्या वतीने शाळेतील कर्मचार्‍यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र बापूसाहेब गुंड होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण संचालक नामदेव जरग, प्राचार्य डॉ. उमेश प्रधान व माजी शिक्षणाधिकारी गोविंद खुरंगे हे उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक बापूराव शिंगाडे म्हणाले, या यशामध्ये विद्यार्थी, ग्रामस्थ शिक्षक व संस्था यांचा महत्त्वाचा वाटा आहे. महेंद्र गुंड म्हणाले, ही योजना गेल्या वर्षी सुरु झाली असून, पहिल्या वर्षीचा प्रथम क्रमांक कुळधरणच्या नूतन मराठी विद्यालय तसेच यावर्षीचा जनता विद्यालयाने मिळवला. दोन्ही वर्षीचे बक्षीसे आपल्याच संस्थेने मिळवले आहेत. सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झालेले आहे. यावर न थांबता जिल्हास्तर, विभागस्तर तसेच राज्यस्तरावरील बक्षीसे असतील. जोपर्यंत यापुढील बक्षीस मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. या अभियानापुरता विषय नसून शाळेच्या गुणवत्तेबाबत सतत आम्ही प्रयत्नशील आहोत. यावेळी नामदेव जरग म्हणाले, शाळेचे खरे सौंदर्य जाणवले पाहिजे, सौंदर्य मनात निर्माण झाले पाहिजे, सौंदर्य प्रसन्नतेमध्ये व्यक्तिमत्त्वांमध्ये असावे लागते. या सर्व गोष्टींची सुंदरता शाळेचे मुख्याध्यापक बापूराव शिंगाडे, सर्व शिक्षक, विद्यार्थी, परिसरातील ग्रामस्थ यांच्यामुळे निर्माण झाले. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन. प्राचार्य डॉ. उमेश प्रधान म्हणाले, शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना संधी प्राप्त करून देणे असते. ही जीवनात फार महत्त्वाची बाब असून संधी मिळाल्यास त्याचे सोने करणे हे विद्यार्थ्याचे काम आहे. जो संधीचे सोने करतो तो यशस्वी होतो. यावेळी ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर, माजी चेअरमन दिनकर कोपनर, पोलीस पाटील हनुमंत पंडीत, परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू सूर्यवंशी व संजय खराडे यांनी केले. विठ्ठल श्रीराम यांनी आभार मानले.

COMMENTS