Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तेची हवा डोक्यात गेलेल्यांना जनता धडा शिकवते ः खासदार लंके

अकोले ः सत्ता असताना जर जनतेची कामे केली तर सत्ता गेल्यावर सुद्धा जनता डोक्यावर घेते परंतु राजकारणांत निवडून आल्यानंतर डोक्यात हवा जाते. राजकारणा

खा. लंके यांनी बनपिंप्री येथील टोल वसुली थांबविली
खासदार लंके यांचा शेवगावात संविधान देऊन सन्मान
श्रीगोंद्यात खा. निलेश लंके यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन

अकोले ः सत्ता असताना जर जनतेची कामे केली तर सत्ता गेल्यावर सुद्धा जनता डोक्यावर घेते परंतु राजकारणांत निवडून आल्यानंतर डोक्यात हवा जाते. राजकारणात मते मिळेपर्यंत नेते मंडळी पाया पडतात, लोटांगण घालतात आणि सत्ता मिळतात नागाचा फणा उभारतात अशांना सत्ता गेल्यावर जनता किंमत देत नाही असेही मत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले. समाजासाठी जगणार्‍यांच्या आयुष्याचं सोनं होतं , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा गोरगरिबांसाठी काम करणारा पत्रकार संघ आहे असे ही खासदार नीलेश लंके म्हणाले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय वारकरी समाजभूषण पुरस्कार खासदार निलेश लंके यांना प्रदान करण्यात आला.
        महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अकोले यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात लंके बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची राज्य सरचिटणीस डॉ. विश्‍वासराव आरोटे होते. यावेळी शिवव्याख्याते प्रा प्रदीप कदम, पी आय गुलाबराव पाटील, पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, सागर शिंदे, राष्ट्रसेवा दलाचे राज्य सरचिटणीस विनय सावंत, जिल्हाध्यक्ष ऊत्तर सोमनाथ काळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, सुभाष डोके, अली सय्यद, सुनील गीते, राजेंद्र उकिरडे आदि उपस्थित होते. अनेक शिक्षक नोकरीला असताना काम करत नाही साहेबाला चार दिवस मॅनेज करतात आणि चार दिवस काम करतात ज्या शिक्षकांनी न शिकवतात पिढ्या बरबाद केल्या अशा शिक्षकांचे मुलं आज शेळ्या वळताना दिसत आहे अशी टीका त्यांनी शिक्षकांवर केली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्‍वासराव आरोटे यांनी बोलताना सांगितले की आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून शालेय साहित्य व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा साजरा केला जातो शिक्षकांनी आम्हाला घडवली त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी असे उपक्रम राज्यभर राबविले जातात. पत्रकार संघाचा राज्यस्तरीय समाजभूषण वारकरी पुरस्कार खासदार निलेश लंके यांना प्रदान करण्यात आला.  विणा, संत तुकाराम महाराज मूर्ती, तुकाराम महाराज पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह बुक्का लावून पुरस्कार देण्यात आला. आदर्श शेतकरी पुरस्कार शिवाजी नाईकवाडी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाधव सर यांना प्रदान करण्यात आला.  कार्यक्रमात स्वागत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे  यांनी तर प्रास्ताविक विभागीय सचिव अनिल रहाणे यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता जाधव तर आभार हरिभाऊ फापाळे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ आवारी, जगन्नाथ आहेर, वसंत सोनवणे, ललित मुतडक, अशोक शेळके, सहसचिव सचिन लगड, सरचिटणीस प्रविण धुमाळ, संघटक सुरेश देशमुख, सह संघटक दत्ता हासे, राजेंद्र मालुंजकर, निवड समिती प्रमुख गणेश रेवगडे, इले. मिडिया प्रमुख सचिन खरात, सोशल मिडिया सचिव शुभम फापाळे, प्रसिद्धी प्रमुख दत्तु जाधव, राजेंद्र राठोड, सुनिल आरोटे, संपर्क प्रमुख संजय गायकर, प्रकल्प प्रमुख निलेश वाकचौरे, खजिनदार भागवत खोल्लम, सोशल मिडिया प्रमुख सुनिल शेणकर, हल्ला विरोधी समिती शंकर संगारे, सो.मि.प्रसिद्धी प्रमुख ओंकार अस्वले, रजिस्टार निखिल भांगरे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व डॉ. विश्‍वासराव आरोटे हे गरिबांसाठी काम करणारे आहेत 21 वर्ष गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा त्यांना वह्या दप्तर व शालेय उपयोगी साहित्य वाटप करतात दिवाळीत किराणा वाटप करतात हे गरिबांचे अश्रू पुसणारे व माणसात देव पाहणारी व्यक्ती आहे.
नीलेश लंके, खासदार

COMMENTS