भाजप शहराध्यक्ष भय्या गंधेंचा नगर अर्बन बँकेला जय श्रीराम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप शहराध्यक्ष भय्या गंधेंचा नगर अर्बन बँकेला जय श्रीराम

अहमदनगर/प्रतिनिधी :आर्थिक गैरव्यवहारांमुळे अडचणीत सापडलेल्या नगर अर्बन बँकेला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनीही जय श्रीराम केला आहे. भविष्या

अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार : वसंत लोढा
नगर अर्बन बँकेचे अधिकारी…आता रडारवर
नगर अर्बन बँकेवर गणेश गायकवाड यांची अवसायक म्हणून नियुक्ती

अहमदनगर/प्रतिनिधी :आर्थिक गैरव्यवहारांमुळे अडचणीत सापडलेल्या नगर अर्बन बँकेला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनीही जय श्रीराम केला आहे. भविष्यात पक्षाद्वारे मोठी जबाबदारी येणार असल्याने नगर अर्बन बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे गंधे यांनी सांगितले आहे. दरम्यान, बँकेचे संचालकपद सोडणारे गंधे हे तिसरे संचालक ठरले आहेत. याआधी संचालिका संगीता गांधी व तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी संचालकपद सोडले आहे व आता गंधे यांनीही बँकेला राम राम ठोकल्याने तो बँकेच्या वर्तुळात चर्चेचा झाला आहे.

आरबीआयचे निर्बंध, खोटी कर्ज प्रकरणे व त्यातून झालेला गैरव्यवहार, बनावट सोने तारण कर्ज प्रकरणे व 150 कोटीवर रकमेची 28वर कर्ज प्रकरणांतील गैर व्यवहार यामुळे पोलिस ठाण्यात दाखल झालेले विविध गुन्हे यासह अन्य कारणामुळे अर्बन बँक नगरसह राज्यात गाजत आहे. दररोज नवनवीन माहिती व बँकेचे घोटाळे सोशल मीडियातून समोर येत आहे. बँकेतून पैसे मिळत नसल्याने खातेदारांनी उपोषणही केले होते. अशा पार्श्‍वभूमीवर आता आठ-नऊ महिन्यांपूर्वीच्या निवडणुकीत निवडून आलेले संचालकही पळपुटेपणा करीत संचालक पदांचे राजीनामे देऊ लागल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, नगर बँकेचे संचालक तथा भाजपचे शहराध्यक्ष भैय्या तथा महेंद्र गंधे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा प्रभारी अध्यक्षा दीप्ती गांधी यांच्याकडे दिला आहे. भाजपकडून माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे, त्यामुळे बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

COMMENTS