मुंबई/प्रतिनिधी : राज्यात केंद्रीय तपास यत्रंणांच्या कारवायांना वेग आला असून, शनिवारी मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात केंद्रीय तपास यत्रंणांच्या कारवायांना वेग आला असून, शनिवारी मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. तिची सात कोटी 27 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 200 कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणाच्या मागील वर्षी जॅकलीन फर्नांडिस हिला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावले होते. तिची चौकशी झाली होती. आजच्या कारवाईसंदर्भात ‘ईडी’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिला 5.71 कोटी रुपयांच्या भेटवस्तु दिल्या होत्या. तसेच सुकेशने जॅकलिनच्या नातेवाईकांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये अलिशान कार, महागड्या वस्तू यांचा समावेश आहे. सुकेश याने दिल्ली येथील कारागृहात आहे. या काळातही त्याने एका महिलेचे 200कोटी रुपयांवर डल्ला मारला होता. याच पैशातून त्याने जॅकलिन फर्नांडिस हिला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या. यामध्ये हिरे, सोन्याचे दागिने आणि 52 लाखांच्या घोडा यांचा समावेश होता. सुकेश याने हे सर्व पैसे मनी लॉड्रिंगमधून कमवले होते. आता जॅकलिनची संपतीच जप्त केल्याने याप्रकरणी तिच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर तसेच त्याच्या पत्नीसह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र तब्बल सात हजार पानी आहे.
COMMENTS