मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट कशी लागली याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलतांना
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट कशी लागली याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलतांना फडणवीस म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आले होते. शरद पवार म्हणतात की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यात माझा कोणताही हात नव्हता. मात्र, प्रत्यक्षात त्यांनीच पाठवलेल्या पत्रामुळे राष्ट्रपती राजवट लागली, असा गौप्यस्फोटफडणवीस यांनी केला.
यासंदर्भात बोलतांना फडणवीस म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. यामुळे महाराष्ट्रात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या होत्या. य भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या, त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आले नाही. त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले, परंतु त्यांच्या महायुतीकडेही बहुमत नव्हते. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करू इच्छित आहे. त्यानंतर एक बैठक झाली, ज्यामध्ये मी, अमित शहा, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, असेफडणवीस यांनी सांगितले. 10 नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन झाले नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे त्या वेळी स्पष्ट होते. त्या बैठकीत हेही ठरले होते की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करू. त्यादरम्यान, शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि नंतर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील, अशी घोषणा करतील. हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरले होते, असा दावाही फडणवीस यांनी केला. राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले, मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्त्वाचं होतं. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आले होते. पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी पवार यांनी त्यात काही बदल सुचवले. त्यामुळे जर पवार म्हणत असतील की राष्ट्रपती राजवट लागू होणे त्यांच्या योजनेचा भाग नव्हता, तर प्रत्यक्षात त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाली, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीसांनी राजकारणातील माझे स्थान ओळखावे : शरद पवार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता खा. शरद पवार यांनी पलटवार केला आहे. तेव्हा राज्यात मी सत्तेत नव्हतो, माझ्याकडे काही संस्थेचे सदस्यत्व देखील नव्हते. तरी देखील मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली, याचा अर्थ त्यांनी ओळखला पाहिजे. त्यांनी राज्यातील राजकारणातील माझे स्थान काय आहे? हे ओळखावे असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे.
COMMENTS