ते भास्कर जाधव नसून बाष्फळ जाधव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ते भास्कर जाधव नसून बाष्फळ जाधव

राज्यसभा खासदार अनिल बोडे यांची टीका

अमरावती प्रतिनिधी-  शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांनी खासदार नारायण राणे(Narayan Rane) यांच्यावर अर्वाच्छ शब्दात टीका केली. याच

या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.. भास्कर जाधव यांची भावनिक साद
मध्यरात्री जाधव यांच्या घरावर दगडफेक
भुंकणारा कुत्रा चावत नसतो;शिवसेनेवर रामदास कदमांची जहरी टीका

अमरावती प्रतिनिधी-  शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांनी खासदार नारायण राणे(Narayan Rane) यांच्यावर अर्वाच्छ शब्दात टीका केली. याच पार्श्वभूमीवर अनिल बोंडे यांनी अमरावतीत प्रत्युत्तर देत भास्कर जाधव यांना आरसा दाखवला आहे. अनिल बोंडे म्हणाले, ते भास्कर जाधव नसून बाष्फळ जाधव आहेत. ते सातत्याने कोणाचीही मिमिक्री करत असतात. याचे परिणाम त्यांना विधानसभेत भोगावे लागले आहे. यापूर्वी त्यांना माफी सुद्धा मागावी लागली होती. त्यामुळे त्यांनी हे धंदे सोडावे सोबतच आपणच कसे खरे शिवसैनिक आहोत हे दाखवण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते. मात्र त्यांनी अंतर्मुख होऊन आपणही धुतल्या तांदळाचे नसून शेकडो पक्ष बदलून आता शिवसेनेत आलो आहोत त्यामुळे ते भास्कर जाधव नसून  बाष्फळ    जाधव आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार बोंडे यांनी दिली आहे.

COMMENTS