Homeताज्या बातम्यादेश

इस्त्रोने अंतराळात केले यशस्वी डॉकिंग

बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने गुरूवारी अंतराळात दोन अंतराळयानांना यशस्वीरीत्या डॉकिंग केले आहे. असे करणारा भारत हा जगातील

कवठेत शॉटसर्किटने आग लागून पन्नास गुंटे ऊस जळुन खाक; अडीच लाखाचे नुकसान
जागतिक संशोधन यादीत डॉ. अभिजीत कदम
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 733 नवीन रुग्ण

बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने गुरूवारी अंतराळात दोन अंतराळयानांना यशस्वीरीत्या डॉकिंग केले आहे. असे करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. याआधी केवळ रशिया, अमेरिका आणि चीनलाच हे यश मिळाले आहे. इस्रोने सांगितले की डॉकिंगचा प्रयोग 16 जानेवारीला सकाळी पूर्ण झाला. याआधी दोन वेळा डॉकिंगचा प्रयोग पुढे ढकलावा लागला होता. इस्रोने सोशल मीडियावर पोस्ट करत याला ऐतिहासिक क्षण म्हटले आहे.
इस्रोने 30 डिसेंबर 2024 रोजी स्पेस डॉकिंग प्रयोग सुरू केला होता. त्यानंतर 12 जानेवारी रोजी डॉकिंग चाचणी दरम्यान, इस्रोने दोन्ही उपग्रहांना 3 मीटरपेक्षा कमी अंतरावर आणले होते आणि त्यांना सुरक्षित अंतरावर परत आणले होते.

COMMENTS