श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी एकाचवेळी 36 उपग्रह लाँच केले. ब्रिटिश कंपनीच्या उपग्रहांना घेऊन एलव्हीएम-3 रॉकेटने सक
श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी एकाचवेळी 36 उपग्रह लाँच केले. ब्रिटिश कंपनीच्या उपग्रहांना घेऊन एलव्हीएम-3 रॉकेटने सकाळी 9 वाजता श्रीहरिकोटा येथून अवकाशात आकाशात उड्डाण घेतली.विशेष म्हणजे हे रॉकेट आपल्यासोबत अंतराळा एकत्र 36 सॅटेलाइट घेऊन गेल्याने एक वेगळा इतिहास रचला.
इस्रोच्या साडे 43 मीटर लांबीच्या या रॉकेटनी ब्रिटेनच्या एका कंपनीचे 36 उपग्रह आपल्यासोबत घेऊन अवकाशात झेप घेतली. उपग्रहांना घेऊन एलव्हीएम-3 ने झेप घेतल्यानंतर त्याचं एकूण वजन 5 हजार 805 टन आहे. या मिशनला एलव्हीएम-3 /वनवेब इंडिया-2 असं नाव देण्यात आलं. इस्रोने ट्वीट करुन या मिशनच्या लाँचिगची माहिती दिली होती. एलव्हीएम-3 इस्रोचा सर्वात मोठा रॉकेट आहे ज्याने आता पर्यंत पाच वेळा यशस्वी उड्डाण केले आहे. ज्यामध्ये चंद्रयान-2 मिशनसुद्धा सहभागी आहे. मुळात ब्रिटेनची वनवेब ग्रुप कंपनीने इस्रोच्या वाणिज्यिक शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेडपासून 72 उपग्रह लाँच करण्याचा करार केला आहे. यामध्ये 23 ऑक्टोबर 2022 रोजी 23 उपग्रह इस्रोने यापूर्वीच लाँच केले होते. आज बाकी असलेले 23 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत जाणार आहेत. इस्रोच्या या लाँचिगमुळे पृथ्वीच्या कक्षेत वेब वन कंपनीचे उपग्रहांची एकूण संख्या 616 होणार. इस्रोचा या वर्षीचा हा दुसरा लाँच आहे. ही लाँचिग यशस्वी झाल्यास वनवेब इंडिया-2 स्पेस मध्ये 600 पेक्षा जास्त लोअर अर्थ ऑर्बिट सेटेलाइट्सच्या कान्स्टलेशन पुर्ण करणार. सोबतच यामुळे जगातील प्रत्येक स्पेस आधारीत ब्रॉडबँड इंटरनेट योजनामध्ये मदत मिळणार आहे.
COMMENTS