Homeताज्या बातम्यादेश

इस्रोने थांबवली चंद्रावरील शोधमोहीम

बंगळुरू प्रतिनिधी - चंद्रयान-3 मोहिमेचा चंद्राच्या भूमीवर 14 दिवसांचा नियोजित टप्पा आता हळूहळू संपत आला आहे. या मोहिमेत प्रज्ञान रोव्हरनं दिल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेतून 1119 नवीन वीजजोडण्या
चंद्रावर आढळलं ऑक्सिजन, सल्फर अन् लोखंड
कोयना जलविद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना पद भरतीत प्राधान्य : ना. शंभूराज देसाई

बंगळुरू प्रतिनिधी – चंद्रयान-3 मोहिमेचा चंद्राच्या भूमीवर 14 दिवसांचा नियोजित टप्पा आता हळूहळू संपत आला आहे. या मोहिमेत प्रज्ञान रोव्हरनं दिलेलं काम पूर्ण केल्याचं इस्रोनं जाहीर केलं आहे. इस्रोने असेही म्हटले आहे की 22 सप्टेंबर रोजी रोव्हरचे यशस्वी जागा होण्याची आशा आहे – जेव्हा पुढील सूर्योदय अपेक्षित आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतानं विक्रम लँडर चंद्रावर उतरवून इतिहास घडवला. त्यानंतर वैज्ञानिक प्रयोगांचा, माहिती गोळा करण्याचा टप्पा सुरू झाला. विक्रम, प्रज्ञान आणि चंद्रयान-3 च्या प्रपल्शन मोड्यूलनंही निरीक्षणं नोंदवली आणि अनेक घटकांविषयी महत्त्वाची माहिती गोळा केली. त्यातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाचं चित्र उलगडेल अशी आशा वैज्ञानिकांना वाटते आहे.

प्रज्ञान ‘स्लीप मोड’ वर – प्रज्ञान रोव्हरवर सोपवलेली कामं पूर्ण झाली असून हे यान सुरक्षित जागी थांबवण्यात आल्याचं इस्रोनं जाहीर केलं आहे. प्रज्ञानची बॅटरी पूर्ण चार्ज करण्यात आली असून, त्याला आता ‘स्लीप मोड’वर टाकण्यात आलं आहे. म्हणजे या रोव्हरवरची इलेक्ट्रॉनिक आणि वैज्ञानिक उपकरणं बंद करण्यात आली आहेत. प्रज्ञान रोव्हरवरची अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर आणि लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप ही उपकरणं बंद करण्यात आली आहेत. प्रज्ञानवरचं सोलर पॅनेल अशा दिशेनं वळवण्यात आलं आहे जेणेकरून चंद्रावर पुन्हा सूर्योदय होईल, तेव्हा तो प्रकाश पॅनेलवर पडेल. त्याचे रीसीव्हर सुरू ठेवण्यात आले आहेत. 22 सप्टेंबर 2023 रोजी चंद्रावर पुन्हा सूर्योदय होईल तेव्हा प्रज्ञान जागा होण्याची आशा इस्रोचे वैज्ञानिक करत आहेत. हे शक्य नसलं तरी कठीण मात्र आहे. प्रज्ञान या 14 दिवसांच्या शीतनिद्रेतून जागा झाला नाही, तर तो भारताचा कायमस्वरूपी दूत म्हणून चांद्रभूमीवर राहील, असं इस्रोनं म्हटलं आहे.

प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर कोणते पदार्थ सापडले – चंद्रयान-3 मोहिमेनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सल्फरचं अस्तित्व असल्याचा पहिला थेट पुरावा मिळवला आहे. प्रज्ञान रोव्हरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजन अशा मूलद्रव्यांची नोंद केली आहे. इस्रोने मंगळवारी ही माहिती दिली, “सुरुवातीच्या परीक्षणात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अल्युमिनिअम, सल्फर, कॅल्शिअम, आयर्न, क्रोमिअम, टायटेनियम, मॅंगनीझ, सिलिकॉन आणि ऑक्सिजन सापडलं आहे.”

प्रज्ञान रोव्हरवरच्या लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी अर्थात LIBS या उपकरणाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. हे उपकरण एखाद्या पृष्ठभागावर लेकराचं मारा करून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाचा वर्णपट तपासतं आणि त्यातून त्या ग्राहावर कोणती खनिजे आहेत यांचा अंदाज येतो. त्याआधी चंद्रावर भारताने पाठवलेल्या प्रज्ञान रोवर पृथ्वीवर राहणाऱ्यांसाठी एक संदेश पाठवला आहे. तो आणि त्याचा मित्र विक्रम लँडर दोघंही एकदम बरे असल्याचा संदेश त्यांनी पाठवला आहे.

COMMENTS