Homeताज्या बातम्याविदेश

इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला

’हमास’चा टॉप कमांडर इब्राहिम बियारी ठार

जेरूसेलम ः गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले इस्त्राइल आणि हमास पॅलेस्टाईनचे युद्ध अजूनही सुरूच आहे. बुधवारी या युद्धाचा 25 वा दिवस असून, इस्त्

मोक्कातील आरोपी कासारला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट…?; भालसिंग यांचा आरोप
मराठा आरक्षणासाठी कोपरगावात बेमुदत आमरण उपोषण सुरू
गाद्याच्या दुकानाला भीषण आग, दुकान पूर्णता जळून खाक | LOKNews24

जेरूसेलम ः गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले इस्त्राइल आणि हमास पॅलेस्टाईनचे युद्ध अजूनही सुरूच आहे. बुधवारी या युद्धाचा 25 वा दिवस असून, इस्त्राईलने गाझावर हवाई हल्ले केले. या युद्धात अनेकांचा मृत्यू झाला असून, बुधवारी इस्त्राईलने केलेल्या हल्ल्याचा हमासचा टॉप कमांडर इब्राहिम बियारी याचा खात्मा झाला, असा दावा इस्रायल सैन्याकडून करण्यात येत आहे.
इस्रायलच्या संरक्षण दलाचे म्हणणे आहे की, काही वेळापूर्वी गाझा पट्टीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या सेंट्रल जबलिया बटालियनचा कमांडर इब्राहिम बियारी मारला गेला आहे. याशिवाय हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी देखील मारले गेले मारले गेले आणि भूमिगत दहशतवादी बोगदे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे जवळपासच्या अनेक इमारती कोसळल्या, असे लष्कराने सांगितले. दुसरीकडे हमासने हा दावा खोडून काढला असून हल्ल्यात 50 निष्पाप लोकाचा जीव गेल्याचे हमासचे म्हणणे आहे. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, बियारी हा त्या कमांडरपैकी एक होता ज्यांनी हमासच्या एलिट नुखबा सैन्याच्या सदस्यांना 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करण्याचा आदेश दिला होता. 2004 मध्ये अश्दोद बंदरावर दहशतवादी हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांना पाठवण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. ज्यामध्ये 13 इस्रायली ठार झाले होते. जबलियामध्ये लष्कराने हवाई हल्ले केले असून, हमासच्या सैनिकांना ठार करून परिसराचा ताबा घेतला आहे. दरम्यान, हवाई हल्ल्यात हमासच्या भूमिगत पायाभूत सुविधा नष्ट झाल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS