Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाट्य स्पर्धेत ईशान कोयटेची यशस्वी कामगिरी

कोपरगाव शहर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 20 वी महाराष्ट्र बाल नाट्य स्पर्धेच्या विभागीय पारितोषिक वितरण समारंभ न

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे बदनामी करणार्‍यांचा निर्णय नागरिकच घेतील
ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्र अहमदनगर जिल्ह्यात प्रथम
केडगाव उपनगरामध्ये भरदिवसा बिबट्याचा हल्ला

कोपरगाव शहर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 20 वी महाराष्ट्र बाल नाट्य स्पर्धेच्या विभागीय पारितोषिक वितरण समारंभ नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात 23 जुलै 2024 रोजी पार पडला. या समारंभात समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी ईशान स्वाती संदीप कोयटे याने केलेल्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल जेष्ठ व थोर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी सुद्धा तालुका, जिल्हा स्तरावर आयोजित बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळविलेली आहेत.
नुकतीच संपन्न झालेली 20 वी महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेत अहमदनगर व नाशिक विभागातून समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने प्राथमिक फेरीमध्ये धनंजय सरदेशपांडे लिखित व किरण लद्दे दिग्दर्शित ’एलियन्स द ग्रेट’ या बाल नाट्याचे दर्जेदार सादरीकरण केले होते. सदर बाल नाट्यात ईशान स्वाती संदीप कोयटे याने ’गुडमा कायलो’ ची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. विभागीय पारितोषिक वितरण समारंभ राज्यातील ज्येष्ठ व थोर रंगकर्मींच्या उपस्थितीत पार पडला. ईशान स्वाती संदीप कोयटेच्या या यशाबद्दल समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्‍वस्त  स्वाती कोयटे, प्राचार्य डॉ. विनोदचंद्र शर्मा, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS