Homeताज्या बातम्यामनोरंजन

उर्फी जावेदने गुपचुप उरकला साखरपुडा?

मुंबई- लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत अस

उर्फी जावेदला जिवे मारण्याची धमकी
झोपाळ्यावर उभं राहणं उर्फीला पडलं महागात
उर्फी जावेदवर भडकले प्रसिद्ध कॉमेडियन

मुंबई– लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या अनोख्या फॅशन सेन्सने चाहत्यांना नवनवे धक्के देत असते. कधी तिच्यावर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात तर कधी तिला वाईट म्हणतात. मात्र ती सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आता पुन्हा एकदा उर्फी चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. त्याचं कारण ठरलंय तिचे नवे फोटो. उर्फीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत ज्यात ती एका व्यक्तीसोबत दिसतेय. या फोटोंवरून तिचा साखरपुडा झाला असल्याचं म्हटलं जातंय. एका इंस्टाग्राम चॅनेलने पोस्ट केलेल्या फोटोंची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे. या फोटोंमध्ये उर्फी एका व्यक्तीसोबत बसली आहे. तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे. कपाळावर टिकली लावली आहे. तर त्यांच्या समोर पूजेचं साहित्य आहे. समोर होम जळताना दिसतोय. फुलं, फळं आहेत आणि एका फोटोमध्ये ब्राह्मण मंत्र म्हणताना दिसत आहे. दोन्ही फोटोत त्यांच्या हातात वेगवेगळी फुलं आहेत. फोटोतील मुलाचा चेहरा लपवण्यात आला आहे. उर्फीने काहीही भाष्य केलं नसलं तरी ती फोटोत आनंदी दिसत आहे. हे फोटो पाहून नेटकरीही निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

COMMENTS